
मुंबई : पुण्यातील माळीण गावाच्या पुर्नवसनासाठी मुंबईतील सिध्दीविनायक मंदिर ट्रस्ट समितीने 50 लाख रूपयांची मदत जाहीर केली आहे.
माळीण गावच्या मदतीसाठी धावले सिध्दीविनायक
बुधवारी मुसळधार पावसामुळे दरड कोसळून पुण्यातील माळीण येथे संपूर्ण गावच उद्धवस्त झाले. या दुर्घटनेत अनेक जण दरडी खाली गाडले गेले असून, आतापर्यंत 23 जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. दरम्यान, गावाचे पुर्नवसन करण्यासाठी सिध्दीविनायक मंदिर समितीने 50 लाख रूपयांची मदत जाहीर केली आहे.
