रिझर्व्ह बँकेचे कर्ज बुडव्या कंपन्यांवर निर्बंध

RBI
मुंबई : भारतीय रिझर्व्ह बँकेने कर्ज बुडव्या कंपन्यांवर कडक निर्बंध लादण्याचा निर्णय घेतला असून बँकेने सेबीला अशा कंपन्यांना शेअर बाजारातून निधी गोळा करण्यापासून रोखण्याचा सल्ला दिला आहे.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, भारतीय रिझर्व्ह बँक व सेबी यांनी जाणूनबुजून कर्ज बुडविणा-या कंपन्यांना शेअर बाजारातून निधी गोळा करण्यापासून रोखण्यासाठी संयुक्तपणे नवे मार्ग शोधण्यास सुरूवात केली आहे. यामुळे काळया यादीतील अशा कंपन्यांना सेबीच्या कार्यक्षेत्रात शेअर बाजार व अन्य माध्यमातून पैसे गोळा करण्यापासून रोखता येणे शक्य होणार आहे.

Leave a Comment