विस्कळीत रेल्वे आणि ट्रॅफीक जाममुळे मुंबईकरांची त्रेधा

mumbai-rain
मुंबई – मुंबईकर मागील पाच दिवसांपासून सतत कोसळत असलेल्या वरुणराजामुळे हैराण झाले आहेत. मुंबई, उपनगर आणि नवी मुंबईत आजही सकाळपासून दमदार पावसाने हजेरी लावली असून मुसळधार पावसामुळे रेल्वे सेवा विस्कळीत झाली आहे. तर, रस्त्यांवरही मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी पहायला मिळत आहे.

सिग्नल यंत्रणेत बिघाड झाल्याने जीटीबी नगर-वडाळा दरम्यान हार्बर मार्गावरील गाड्या १० मिनिटे उशिराने धावत आहे. तर मध्य रेल्वेची वाहतूकही १० ते १५ मिनिटे उशिराने सुरु आहे. मात्र पश्चिम रेल्वेमार्गावरची वाहतूक सुरळीत आहे.

रस्तेही पावसामुळे जलमय झाले आहेत. ठिकठिकाणी पाणी साचले आहे. यामुळे वाहतुकीचाही खोळंबा झाला आहे. शहरातील प्रमुख रस्त्यांवर वाहतूक धीम्या गतीने सुरु आहे. त्यामुळे कामावर जाणाऱ्या मुंबईकरांचे हाल झाले. अंधेरी सीप्झ ते एमआयडीसी, जेव्हीएलआर येथे वाहतूक कोंडी झाली आहे. अंधेरी रेल्वे स्थानक, गोरेगाव, घाटकोपर येथेही वाहनचालकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला.

Leave a Comment