
दुबई – आपल्या पुनर्रचना योजनेतंर्गत मुंबई आणि दिल्लीसाठी आपली सर्व उड्डाणे बंद करण्याचा रॉयल जॉर्डियन एअरलाइन्सने निर्णय घेतला असून मुंबईसाठीचे उड्डाण 10 सप्टेंबरपासून आणि दिल्लीसाठीचे 31 ऑक्टोबरपासून विमान वाहतूक कंपनी बंद करणार आहे. याचबरोबर 10 ऑक्टोबरपासून कंपनी लागोस साठीचे उड्डाण बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.
रॉयल जॉर्डियन एअरलाइन्स बंद करणार दिल्ली, मुंबईची उड्डाणे
एअरलाइन्सचे या तीन ठिकाणाची उड्डाणे बंद झाल्यानंतर एकूण 51 मार्ग शिल्लक राहीले आहेत. रॉयल जॉर्डियन एअरलाइन्सचे संचालक मंडळाचे अध्यक्ष व मुख्य कार्यकारी अधिकारी नासिर लोजी यांनी हा निर्णय एअरलाइन्सची वित्तीय स्थिती सुधारण्याच्या योजनेचा हिस्सा असल्याचे म्हटले आहे.
