भारतात घुसखोरीच्या प्रयत्नात चिनी दूरसंचार कंपनी

reliance
मुंबई – भारतात प्रवेश करण्याचा प्रयत्न इतिहासात पहिल्यांदाच चीनची दूरसंचार कंपनी करत आहे. रिलायन्स कम्यूनिकेशनची अंडरसी केबल सब्सिडियरी कंपनी खरेदी करण्याची योजना चीनची सिटिक टेलिकॉम भारतीय कंपनी बनवत आहे. अनिल अंबानीच्या नेतृत्वाखालील रिलायन्स कम्यूनिकेशनला जर असे झाले तर 1 अब्ज डॉलर्सची भरभक्कम रक्कम मिळणार आहे.

चीनची सिटिक ग्लोबल क्लाउड एक्सचेंज (आधीचे नाव रिलायन्स ग्लोबलकॉम) खरेदी करण्याबाबत चर्चा करत आहे. आरकॉमला या व्यवहाराद्वारे 1 अब्ज डॉलर्सची रक्कम मिळू शकते. आरकॉम देखील क्लाउड एक्सचेंजमधील आपली प्रमुख हिस्सेदारी विकण्यास इच्छूक आहे. दोन्ही कंपन्यांकडून या व्यवहाराबाबत चालू आठवडय़ातच बोलणी सुरू होऊ शकतात.

Leave a Comment