कर्नाटक पोलिसांनी सीमेवर थांबवल्या महाराष्ट्राच्या एसटी

st
बेळगाव : कर्नाटक पोलिसांनी महाराष्ट्र राज्याच्या एसटी बस सीमेवर थांबवल्या असून अनेक एसटी बस उमरगा सीमा तपासणी नाक्यावर अडकून पडल्या आहेत.

महाराष्ट्र एसटी बसना कर्नाटकातील येळ्ळूर प्रकरणाच्या पडसादामूळे नुकसान पोहचु नये म्हणून खबरदारी घेण्यात येत असून उमरगा सीमा तपासणी नाक्यावर बसेस पोलिसांनी थांबवल्यामुळे प्रवाशांचे हाल झाले.

दरम्यान, सीमावर्ती भागातील मराठी भाषकांवर अत्याचार करणाऱ्या कर्नाटक सरकारच्या प्रतीकात्मक पुतळा मनसेने जाळला. पुण्याच्या अलका टॉकीज चौकात हे आंदोलन करण्यात आले. त्यांनतर मनसे कार्यकर्त्यांनी बाजीराव रस्त्यावरील कर्नाटक बँकेच्या बोर्डला काळे फासले. कर्नाटक सरकारने मराठी भाषकांवरील अत्याचार थांबवले नाहीत तर जशाच तसे उत्तर देण्याचा इशारा मनसेने दिला आहे.