टिळक सन्मान पुरस्कार डॉ.अविनाश चंदर यांना जाहीर

chander
पुणे : या वर्षी लांब पल्ल्याच्या क्षेपणास्राचे भारतीय रचनाकार’ अशी ओळख असणारे विख्यात शास्रज्ञ डॉ. अविनाश चंदर यांना लोकमान्य टिळक स्मारक ट्रस्टच्या वतीने दिले जाणारे ‘लोकमान्य टिळक सन्मान पुरस्कार जाहीर करण्यात आल्याची माहिती ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. दीपक टिळक यांनी दिली.

पुरस्काराचे स्वरूप सुवर्णपदक, स्मृतिचिन्ह, सन्मानपत्र आणि एक लाख रूपये, असे असून लोकमान्य टिळकांच्या पुण्यतिथीदिनी म्हणजेच शुक्रवार दि. 1 ऑगस्ट रोजी टिळक स्मारक मंदिरात सायंकाळी सहा वाजता डॉ. टिळक यांच्या हस्ते या पुरस्काराचे वितरण होणार आहे. या वेळी सिक्कीमचे राज्यपाल श्रीनिवास पाटील, ट्रस्टचे विश्वस्त व माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे उपस्थित राहणार आहेत.

Leave a Comment