शिवसेनेचे दहावी पास घोसाळकर पाच वर्षात झाले डॉक्टर

vinod
मुंबई – दहीसरमधील शिवसेनेचे आमदार विनोद घोसाळकर हे दहावी पास असून ते अवघ्या पाच वर्षात डॉक्टर झाले आहेत. घोसाळकर डॉक्टरकीवर प्रश्नचिन्ह उभा राहिला असून ज्या शिक्षण संस्थेतून ही डॉक्टरकी मिळाली त्या संस्थेत अवघ्या ४८ हजारांत डॉक्टरकी दिली जात असल्याचे उघड झाल्याने घोसाळकर गोत्यात येण्याची चिन्ह निर्मांण झाली आहेत. तीन वर्षांपूर्वी कोलकाता येथील विद्यापीठाने मानद डॉक्टरकी प्रदान केली होती.

उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त शिवसेना उपनेते व आमदार विनोद घोसाळकर यांनी दिलेल्या जाहिरातींमध्ये स्वतःच्या नावापुढे डॉक्टर लावल्याने सर्वांच्या भूवया उंचावल्या. घोसाळकर यांना डॉक्टरकीची पदवी कोलकाता येथील इन्स्टिट्यूट ऑफ एज्यूकेशन रिसर्च आणि डेव्हलपमेंट या महाविद्यालयातून मिळाली आहे. हे महाविद्यालय न्यू एज आंतरराष्ट्रीय विद्यापीठाशी संलग्न असल्याचे त्यांच्या संकेतस्थळावर म्हटले आहे. एका इंग्रजी वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तानुसार या विद्यापीठाकडून कोणताही थिसीस सादर न करताही पीएचडी मिळवता येते. यासाठी फक्त ४८ हजार ५०० रुपये मोजावे लागतात असा दावाही वृत्तात करण्यात आला आहे. त्यामुळे घोसाळकर यांच्या डॉक्टरकी विषयी शंका उपस्थित होत आहेत.

Leave a Comment