
योंडे : बाको हराम दहशतवाद्यांच्या कारवायांनी पश्चिम आफ्रिकेतील कॅमेरून देशात उच्छाद मांडला आहे. कॅमेरूनचे उपपंतप्रधान अमाडो अली यांच्या पत्नीचे दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात अपहरण केले आहे.
दहशतवाद्यांनी केले कॅमेरून उप पंतप्रधानांच्या पत्नीचे अपहरण
कॅमरूनच्या माहिती व सूचनामंत्री इस्सा त्चिरोता बाकारी यांनी दिलेल्या महितीनुसार, उपपंतप्रधान अमाडो अली यांचे निवासस्थान नायजेरिया सीमेलगत असलेल्या कोलोफाटा शहरात आहे. या शहरावर बोको हरामच्या दहशतवाद्यांनी हल्ला केला. या हल्ल्यात 10 नागरिकांचा मृत्यू झाला. दहशतवाद्यांनी अली यांच्या निवासस्थनावर हल्ला करून त्यांच्या पत्नीचे अपहरण केले. दुस-या एका घटनेत लामीडो नावाने ओळखले जाणारे धार्मिक नेते सेईनी बौकर यांचेही दहशतवाद्यांनी अपहरण केले आहे.
