दालमिया यांची अध्यक्षपदी, तर गांगुली संयुक्त सचिवपदी निवड

dalmia
कोलकाता : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे माजी अध्यक्ष जगमोहन दालमिया यांची बंगाल क्रिकेट संघाच्या अध्यक्षपदी तर भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार सौरभ गांगुली यांची संयुक्त सचिवपदी बिनविरोध निवड करण्यात आली आहे.

ही निवड 83 व्या सर्वसाधारण सभेत करण्यात आली. क्रिकेट प्रशासकाच्या भूमिकेत सौरभ गांगुली आपल्या नव्या ‘इनिंग’ला सुरूवात करणार असून त्याच्या अनुभवाचा बंगाल क्रिकेट संघाला मोठा फायदा होणार असल्याची प्रतिक्रिया दालमिया यांनी दिली आहे.

Leave a Comment