अबके सावन जमके बरसे!

rain
मुंबई – सोमवारी पहाटेपासून पावसाने मुंबईसह ठाणे, कोकण, विदर्भ, मराठवाडा अशा विविध भागात दमदार हजेरी लावली आहे. ठाणे जिल्ह्यातील पालघर येथील पुल पावसामुळे पाण्याखाली गेल्याने २५ गावांचा संपर्क तुटला आहे. मुंबईत येत्या २४ तासांत मुसळधार पाऊस कायम राहील असा हवामान खात्यानेही अंदाज वर्तवला आहे.

गेल्या काही दिवसांपासून दडी मारलेल्या पावसाने दोन दिवसांपासून पुन्हा कृपादृष्टी दाखवली आहे. मुंबई, मुंबई उपनगरासह ठाणे, कोकण आणि विदर्भात मुसळधार पाऊस पडत आहे. पावसामुळे मुंबईतील सखल भागात पाणी साचल्याने वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे. लोकल गाड्याही काहीशा विलंबानेच धावत असल्याची तक्रार प्रवासी करत आहेत. तर विदर्भात मुसळधार पावसामुळे अप्परवर्धा धरणाचे दरवाजे उघडावे लागले.

डहाणू – पालघर भागात पावसामुळे २५ गावांशी संपर्क तुटला आहे. पालघरमधील सुर्या नदीवरील मासवण पुल पाण्याखाली गेल्याने २५ गावांशी संपर्क तुटला आहे. मरोठ मार्गावरील वाहतूकही ठप्प पडली आहे.

Leave a Comment