
लंडन- भारत इंग्लंड मध्ये सध्या सुरू असलेल्या क्रिकेट सामन्यांचे निकाल काय लागतील ते लागोत मात्र ब्रिटन हरले तर त्यांच्या खेळाडूंना या पराजयासाठी एक कारण नक्की देता येणार आहे. या खेळाडूंना ज्या प्रसिद्ध लँघम हॉटेलमध्ये उतरविले गेले आहे तेथे भूत असल्याने त्यांची झोप व्यवस्थित होत नसल्याची तक्रार केली गेली आहे. वारंवार रात्रीचे कांही भयानक अनुभव आल्यामुळे हे खेळाडू सारख्या खोल्या बदलत आहेतच पण त्यांच्या मैत्रिणी आणि बायका त्यांच्या सोबत राहण्यास तयार नाहीत.
हॉटेल लँघममध्ये भूत असल्याची क्रिकेटपटूंची तक्रार
ब्रिटनचा वेगवान गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉड यानेही रात्रीतच त्याच्या खोलीत अचानक उकाडा वाढला, नळ आपोआप सुरू झाले असा अनुभव सांगताना तो खूप घाबरल्याचेही सांगितले. अन्य एका खेळाडूने रात्रीत खोलीत कुणीतरी असल्याचे वारंवार जाणवत होते मात्र दिवा लावला तर कोणी दिसत नव्हते. बाजूच्या खोलीतील खेळाडूलाही असाच अनुभव आल्याचे सांगितले.
हे हॉटेल १८६५ साली बांधले गेले असून त्याचे उद्घाटन प्रिन्स ऑफ वेल्सच्या हस्ते झाले आहे. या हॉटेलात एकूण सात भुते असल्याची बोलवा आहे. त्यातील खोली क्रमांक ३३३ भुतांची अधिक आवडती आहे. सातातील एक भूत जर्नन डॉक्टरचे व एक सैनिकाचे असल्याचेही सांगितले जाते.
