एका मिनिटांत मऊसूत गरमागरम पोळ्या

roti (1)
आजी किवा आईच्या हातच्या गरमागरम, मऊसूत पोळ्याची चव एकदा चाखली की ती विसरणे अवघड. मात्र आजच्या विभक्त कुटुंबात आजी असेलच असे नाही तर नोकरी करणे गरजेच बनल्याने आईही कामावर जाणारी असेल तर अशा पोळ्या मिळणार कशा? पण आता ही अडचण कमी करण्यासाठी आला आहे रोटीमेटिक रोबो. १ मिनीटाला १ पोळी अशा स्पीडने हा रोबो पोळ्या करू शकतो.

जिपलिस्टीक कंपनीने हा रोबो तयार केला असून ५९९ डॉलर्स म्हणजे ३५ हजार रूपयांत तो मिळू शकणार आहे. मार्च २०१५ मध्ये तो विक्रीसाठी उपलब्ध होईल. या रोबोला १० मोटर्स,१५ सेंसर आणि ३०० पार्टस आहेत. तीन वेगवेगळ्या डब्यातून कणीक, पाणी आणि तेल घातले की हा रोबो भराभर गरमागरम पोळ्या तयार करतो. कणकेऐवजी अन्य पिठे, कोणतेही तेल आणि पाण्यात साखर मीठ घालून विविध चवीच्या पोळ्याही बनविता येतात. या रोबोला एक स्क्रीनही देण्यात आला आहे. त्यातून तुम्ही पोळ्या कशा बनताहेत ते पाहू शकता.

Leave a Comment