
मुंबई : 2013-14 या आर्थिक वर्षात सार्वजनिक क्षेत्रात बँक ऑफ इंडीयाने 1 कोटी 20 लाख नवे ग्राहक जोडले आहेत. आता या नव्या ग्राहकांमुळे बीओआयच्या उपभोक्त्यांची संख्या 7 कोटी 70 लाख झाली आहे. ही माहिती आज बीओआयच्या प्रबंध संचालक विजयलक्ष्मी अय्यर यांनी दिली. बँकेच्या झालेल्या वार्षीक बैठकीत अय्यर यांनी सांगितले की, आर्थिक लाभांश देण्याचा बँकेचा विचार नाही. मार्चमध्ये संपलेल्या आर्थिक वर्षासाठी जानेवारी 2014 मध्ये बीओआयने प्रत्येक शेअरमागे 5 रुपये अंतरिम लाभांश देण्याची घोषणा केली होती.
