मंगळावर ‘नासा’च्या यानात तांत्रिक बिघाड !

nasa
न्यूयॉर्क – मंगळ ग्रहावरील जीवसृष्टीच्या अस्तित्वाच्या खुणा शोधण्यासाठी अमेरिकी अंतराळ संशोधन संघटना नासाने पाठविलेल्या मार्स रोव्हर क्युरियोसिटी यान पंक्चर झाले आहे. त्याच्या चाकाला एक मोठे छिद्र पडल्याचे दिसून येत आहे. एखाद्या टोकादर दगडामुळे चाकाला हे छिद्रे पडले असण्याची शक्यता आहे. मार्स रोव्हर सध्या मंगळावरील माउंट शार्पच्या खालच्या दिशेने पुढे सरकत आहे. अर्थात या यानाचे चाक पंक्चर झाले असले तरी त्याच्या मोहिमेत अजिबात खंड पडणार नाही, असे नासाच्या शास्त्रज्ञांकडून स्पष्ट करण्यात आले. मात्र ही घटना त्यात मोठा अडथळा येऊ शकतो. आता हा रोव्हर आपल्या अन्य पाच चाकांच्या मदतीने आपली उर्वरित मोहीम पूर्ण करेल. त्याचे पंक्चर चाक दुरुस्त करण्याचा अन्य कोणताही मार्ग दिसत नाही. यापुढे हे यान कमी खडकाळ वा वालुकामय भागात फिरविणे एवढा एकच उपाय त्यावर आहे.

Leave a Comment