सरकारी पैशांची उधळपट्टी करत आहेत नवाज शरीफ

nawaz
इलाहाबाद: पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांच्या विरोधात सरकारी पैशांची उधळपट्टी केल्याप्रकरणी लाहोर उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. ही याचिका वकील सय्यद फिरोज शाह गिलानी यांनी दाखल केली आहे.

शरीफ यांनी सरकारी निधीतून २ बुलेट प्रुफ कार खरेदी केल्या असून, त्यावर २२ कोटी ४० लाख रूपये खर्च केले असल्याचे याचिकेत म्हटले आहे. तसेच त्यांनी श्वान पथकावर २४ लाख रूपयांचा खर्च केल्याचा आरोपही यात करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे शरीफ यांनी सरकारचा पैसा स्वतःच्या घराच्या डागडुजीसाठी आणि रंगरंगोटीवरही वापरला आहे.

शरीफ यांनी देशाची अर्थव्यवस्था मंदावली असताना वैयक्तिक खर्चासाठी सरकारी खजिन्याचा वापर केला असल्याचे गिलानी यांनी सांगितले आहे.