टिबीचे निदान अर्ध्या तासात करणारे यंत्र

tb
जगात क्षय अथवा टिबी रूग्णांची संख्या लक्षणीय आहे. मात्र या रोगाचे निदान करण्यासाठी सध्या ज्या चाचण्या आहेत त्यांच्या सहाय्याने निदान करण्यास कांही तास अथवा दिवसांचा अवधी लागतो. स्टॅनफोर्ड मधील रसायनतज्ञ जियांगहोंग राओ व टेक्सास येथील सूक्ष्मजीवशास्त्र तज्ञ जेफरी सिरिलो यांनी टिबीचे निदान अर्ध्या तासात करणारे यंत्र विकसित केले असून हे यंत्र बॅटरीवर चालते तसेच ते कुठेही वाहून नेता येते.

सध्याच्या टिबीच्या जनुकीय चाचण्यांसाठी विशेष प्रकारची यंत्रे लागतात तसेच प्रशिक्षित कर्मचारी वर्गही आवश्यक असतो. विकसनशील देश व ग्रामीण भागात त्यामुळे ही यंत्रे उपयुक्त ठरू शकत नाहीत. परिणामी टिबीचे निदान होण्यात विलंब होतो. नव्या यंत्रामुळे ही त्रुटी भरून काढणे शक्य होणार आहे. यात बोन मॅरोमधील वसाची चाचणी केली जाते व त्यातून टिबीचे निदान केले जाते असे सांगितले जात आहे. बोन मॅरोमधील ही वसा डायबेटिस, हृदयरोग व कॅन्सरचा धोका कमी करणारी हार्मोन्स तयार करण्यात महत्त्वाची असते असेही समजते.