बिल क्लिंटन जुलै अखेर भारत दौर्‍यावर

billclinton
दिल्ली- अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बिल क्लिंटन १६ जुलैरोजी भारताच्या दौर्‍यावर येत असून या दौर्‍यात ते लखनौ आणि जयपूर येथे भेट देणार आहेत. जागतिक स्वास्थ्य, जलवायू आणि आर्थिक विकास या मुददयांसंबंधात त्यांची ही भेट असल्याचे सांगितले जात आहे. बिल किलंटन फौंडेशन तर्फे अशा क्षेत्रातील कामांना आर्थिक सहाय्य दिले जाते.

बिल किलंटन १६ ते २३ जुलै दरम्यान आशिया प्रशांत क्षेत्रातील पाच देशांचा दौरा करणार आहेत. भारत, व्हिएतनाम, इंडोनेशिया, पापुआ न्यूगिनी, आणि ऑस्ट्रेलिया या देशांना ते भेट देणार आहेत. ते १६ जुलै रोजी जयपूरला जाणार असून तेथे शालेय विद्यार्थ्यांना पोषक आहार देण्यासाठी जी स्वयंपाकघरे आहेत त्यांना भेटी देणार आहेत. अशा स्वयंपाकघरातून १० लाख शालेय विद्यार्थ्यांना मध्यान्ह भोजन दिले जाते. क्लिंटन फौंडेशन या पाच देशातील सामाजिक प्रश्नांवर लक्ष केंद्रीत करणार आहे.

Leave a Comment