स्मार्टफोन शिवाय जगणे बनतेय अशक्य

smartphone
जग अत्याधुनिक साधने उपकरणांनी सुसज्ज होत असतानाच ही अत्याधुनिक उपकरणे माणसासाठी व्यसन बनत चालल्याचा अनुभवही येतो आहे. अमेरिकन लोकांमध्ये स्मार्टफोनचे व्यसन वाढत चालले असून स्मार्टफोन शिवाय ही मंडळी एक दिवसही जगू शकत नाहीत असे नुकत्याच केलेल्या सर्वेक्षणात दिसून आले आहे. स्मार्टफोन ने अमेरिकन तरूणाईत जिवलग मित्राची जागा घेतली आहे.

मोटोरोला मोबिलिटी आणि जर्मनीच्या कस्टमर केअर फर्म बी टू एकस यांच्यातर्फे हे सर्वेक्षण करण्यात आले. त्यात असे दिसून आले की १७ टक्के अमेरिकन बेस्ट फ्रेंडपेक्षा स्मार्टफोन अधिक जवळचा मानतात. दर सहा पैकी १ अमेरिकन मित्राशिवाय आठवडाभर राहू शकतो मात्र स्मार्टफोन शिवाय एक दिवसही राह शकत नाही. ७४ टक्के लोकांना दिवसभर नजरेसमोर स्मार्टफोन लागतो कारण आपण कांहीही मिस करू नये अशी त्यांची इच्छा असते.

या सर्वेक्षणात असेही आढळले की ६० टक्के अमेरिकन रात्री झोपतानाही स्मार्टफोन जवळ घेऊनच झोपतात आणि त्यात १८ ते २९ वयोगटातील ८४ टक्के लोक आहेत. या तरूणाईला स्मार्टफोन शिवाय १ दिवस काढला तर १०० डॉलर्स बक्षीस देण्याचे आमिष दाखविल्यानंतरही त्यांनी बक्षीस नाकारून स्मार्टफोन शिवाय राहणे अशक्य असल्याचे सांगितले. याचाच अर्थ अमेरिकन स्मार्टफोनला अॅडिक्ट बनले आहेत असा काढला गेला आहे.

Leave a Comment