
रिओ दी जानेरो- जगप्रसिद्ध ‘पॉप स्टार’ शकिराचा जलवा फिफा विश्वचषकाच्या समारोप सोहळ्यात मॅरॅकॅना स्टेडियमवर पाहायला मिळेल. यावेळी नामांकित गिटारवादक कार्लोस सॅँटाना आणि विक्लेफ जीन यांची जुगलबंदीही शकिरासह पाहायला मिळेल.
‘फायनल’मध्ये शकिराचा जलवा
वर्ल्डकपचे अधिकृत गाणे ब्राझीलचा गायक अलेक्झांडर पिरेस हा सादर करेल. सलग तिस-या वर्ल्डकपमध्ये शकिरा तिच्या तालावर सर्वाना डोलवेल. मागील वर्ल्डकपसाठी गायलेले ‘ला ला ला’ हे गाणे ती यंदाच्या समारोप सोहळ्यात सादर करेल.
शकिराने गत वर्ल्डकपमध्ये गायलेले ‘वाका वाका’ हे गाणे आजही फुटबॉलप्रेमी गुणगुणताना दिसतात. मात्र तिची उणीव यंदाच्या वर्ल्डकपच्या उद्घाटन सोहळ्यात जाणवली. ब्राझीलमध्ये पितबूल आणि जेनिफर लोपेझ या नामांकित गायकांची अदाकारी पाहायला मिळाली.
