यंदा झाले दे दना दन गोल

goal
रिओ दी जानेरो- यंदा ‘राउंड ऑफ १६’पर्यंत ५६ लढतींमध्ये १५४ इतके गोल नोंदवले गेले आहेत. सर्वाधिक वैयक्तिक गोलांची संख्याही पाचवर गेली आहे. गोलांची वाढती संख्या पाहता मागील तीन वर्ल्डकपच्या तुलनेत ब्राझीलमध्ये एकूण आणि वैयक्तिक गोलांचा नवा विक्रम दृष्टिक्षेपात वाटतो.

प्रत्येक लढतीमागे गोलांचे सध्या सुरू असलेल्या वर्ल्डकपमध्ये उपांत्यपूर्व फेरीपर्यंत प्रमाण २.७५ इतके आहे. गेल्या तपाचा विचार करताना प्रथमच इतके गोल नोंदवले गेलेत. मागील खेपेस म्हणजे २०१० मध्ये दक्षिण आफ्रिकेत संपूर्ण वर्ल्डकपमध्ये म्हणजे ६४ लढतींमध्ये १४५ गोल झळकावले गेले. त्यावेळी प्रत्येक लढतीमागे २.२७ इतके गोल झाले. २००६ मध्ये जर्मनीत १४७ गोलांची नोंद झाली. त्यावेळी प्रत्येक लढतीमागच्या गोलांचे प्रमाण २.३ इतके होते. २००६ आणि २०१० वर्ल्डकपच्या तुलनेत २००२ मध्ये दक्षिण कोरिया आणि जपानमध्ये झालेल्या वर्ल्डकपमध्ये (६४ लढतींमध्ये १६१ गोल) थोडे जास्त गोल झाले. त्यावेळी प्रत्येक लढतींमागे २.५२ गोलांची नोंद झाली.

Leave a Comment