
लंडन – ब्रिटीश एअरवेज कंपनीने आपल्या विमानातून प्रवास करणार्या प्रवाशांसाठी स्पेशल ब्लॅकेट देण्याचा निर्णय घेतला असून ही ब्लँकेट संशोधकांनी खास तयार केली आहेत. हे ब्लँकेट प्रवाशाने पांघरले की ते प्रवाशाच्या मूडप्रमाणे आपला रंग बदलते असा दावा केला जात आहे.
ब्रिटीश एअरवेजमध्ये रंग बदलणारी ब्लँकेट
हॅपीनेस ब्लँकेट असे या ब्लँकेटचे नामकरण करण्यात आले आहे. या ब्लँकेटमध्ये अत्याधुनिक न्यूरो सेन्सर बसविले गेले आहेत. प्रवाशाने ब्लँकेट पांघरले की हे सेन्सर त्या प्रवाशाच्या मेंदूतील लहरीं नोंदवून त्याप्रमाणे आपला रंग बदलते. त्यावर प्रवाशाची मनस्थिती कशी आहे हे लगेच समजते. हे ब्लँकेट विविध रंग धारण करते.
या ब्लँकेटने नीळा रंग घेतला तर प्रवाशाला चांगलाच आराम मिळतो आहे हे समजू शकते. प्रवाशांना चांगली झोप लागली आहे, त्यांचे मन आनंदी आहे अथवा एखादा प्रवासी नर्व्हस आहे असे विविध मूड विविध रंगांमुळे समजू शकतात असे संशोधकांचे म्हणणे आहे. अर्थात ३० हजार फुटांवरून विमान जात असताना हे सर्व मूड नोंदविले जातात का याची निरीक्षणे सध्या करण्यात येत आहेत. सध्या हिथ्रो ते न्यूयॉर्क या प्रवासात अशी ब्लँकेट दिली जात आहेत.
