जपानी सेनेचे अधिकार वाढले

japan
टोकियो – दुसर्‍या महायुद्धात मोठी हार पत्कराव्या लागलेल्या जपानचे त्यांच्यावर असलेला अमेरिकेचा दबाव झुगारून जपानी सेनेला विदेशात युद्ध करण्यासह अनेक अधिकार प्रदान केले आहेत. जपानी संसदेत या संबंधीचा ठराव नुकताच संमत करण्यात आला. जपानच्या सुरक्षा नितीतील हा सर्वात मोठा बदल मानला जात आहे. मंत्रीमंडळाने या प्रस्तावाला मंजुरी दिली असून सामुहिक आत्मरक्षा अशा नावाने हे नवीन कलम कायद्यात समाविष्ट करण्यात आले आहे.

या नव्या कलमानुसार जपानी सेना अन्य देशांनाही त्यांच्या सुरक्षेत मदत करू शकणार आहे. उदाहरण देताना पंतप्रधान शिजो एबी यांनी जी अमेरिकी जहाजे जपानच्या रक्षणासाठी लढली, त्या जहाजांचे रक्षण करण्यात जपान मदत करेल असे सांगितले आहे. तसेच जपानी सेना आता नव्या कलमाप्रमाणे अफगाणिस्तान आणि इराकमध्येही कारवाई करू शकणार आहे. या कलमाला जपानी जनेतकडून विरोध केला जात असून हा नियम मंजूर करण्यापूर्वी जनमत घेतले जाणे आवश्यक होते असे त्यांचे म्हणणे आहे.

मात्र जपान सरकारने चीनची वाढती लष्करी ताकद, उत्तर कोरियाकडून अण्वस्त्रे वापरण्याच्या सतत येत असलेल्या धमक्या पाहता जपानी सेनेला अधिक बंधनात ठेवणे योग्य नसल्याचे स्पष्टीकरण दिले आहे. जपानच्या या नव्या कायदा दुरूस्तीवर चीननेही आक्षेप नोंदविला आहे.

Leave a Comment