मुंबईकरांसाठी खुला १२०० कोटींचा सायन-पनवेल रस्ता

mumbai
मुंबई – गेल्या अनेक दिवसांपासून सरकारने विकास कामांचा सपाटा लावला आहे. त्यात आज आणखी भर पडली आहे. कारण तब्बल १२५०कोटी खर्चून बांधण्यात आलेला सायन-पनवेल रस्ता आजपासून मुंबईकरांसाठी खुला करण्यात आला आहे.

सायन-पनवेल रस्त्यावर एकूण ६ उड्डाणपूल बांधण्यात आले आहेत. सध्या साय़नहून पनवेलला जाण्यासाठी साधारण दीड तास लागतो. मात्र हा नवा रस्ता सुरू झाल्यानंतर हे अंतर केवळ अर्ध्यातासात पूर्ण करता येणार आहे. त्यामुळे सायन ते पनवेल हा अत्यंत रहदारीचा रस्ता कमी वेळात पार करता येणे आता सहज शक्य होणार आहे. संध्याकाळी हे अंतर पार करणे चाकरनाम्यांसाठी अत्यंत त्रासदायक काम असते. मात्र आजपासून हा रस्ता वाहतूकीस खुला होणार आहे.

त्यासोबतच मुंबई बाहेरून येणाऱ्या प्रवाशांनादेखील हा रस्ता खुला होणार असल्यामुळे मुंबईत लवकर पोहोचणं शक्य होणार आहे. पावसाळ्यामध्ये हा रस्ता खुला करण्यात आल्यामुळे मुंबई आणि नवी मुंबईकरांसाठी ही मोठी आनंदाची बाब आहे.

आगामी विधानसभा निवडणुका नजरेसमोर ठेवून सरकारने विकास कामांचा झपाटा लावला आहे. मात्र त्यामुळे सर्वसामान्यांना त्याचा फायदा मिळत आहे.