ब्राझिलचा संघ पेलणार चिलीचे आव्हान
चिली : वर्ल्डकप फुटबॉल स्पर्धेतील बाद फेरीचे सामने आजूपासून सुरुवात होत आहेत. त्यामुळे आता या बाद फेरीच्यास सामन्यांकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सहा वेळा फुटबॉल विश्वषचषक जिंकत असलेल्या ब्राझिालचा मुकाबला आज चिलीशी होणार आहे. त्यामुळे या लढतीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. यावेळेस ब्राझिलपुढे चिलीचे आव्हािन असणार आहे. हे आव्हान कसे पेलणार याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे.
आतापर्यंत चिली आणि ब्राझिल ६८ वेळा आमनेसामने उभे ठाकले आहेत पण त्यापैकी केवळ आठवेळा ब्राझिलला हार मानावी लागली आहे. शिवाय, वर्ल्डकपच्या इतिहासाकडे पाहिले तर त्यात तिन्हीवेळा ब्राझिलनेच बाजी मारली असून ११ गोलची नोंदही केली आहे. ब्राझिलने साखळीतील लढतीतून ७ गुण मिळविले असले तरी अपेक्षित खेळ त्यांच्याकडून झालेला नाही. पण तुलनेने कमकुवत असलेल्या चिलीने प्रभावी खेळ करून दाखविला आहे.
१९६२मध्ये वर्ल्डकपचे आयोजन केले त्यावर्षी चिलीने स्पर्धेची उपांत्यपूर्व फेरी गाठली होती पण त्यानंतर त्यांना ती कामगिरी करता आलेली नाही. चिलीचे प्रशिक्षक जॉर्ग सॅम्पोली म्हणतात की, दडपण ब्राझिलवर आहे आणि याचा फायदा उठविण्याचा प्रयत्न आम्ही करू. आम्ही इतिहास घडविण्यासाठी वर्ल्डकपमध्ये आलो आहोत. आम्ही स्पेनला हरविले आहे. तेव्हा यावेळी कप जिंकण्याचाच आमचा प्रयत्न असेल. आम्हाला आत्मविश्वास आहे पण ज्या संघात सर्वोत्तम खेळाडू आहेत अशा संघाला नमवायचे आहे, याचीही जाणीव आम्हाला आहे.

