आज रिपाइत प्रवेश करणार राखी सांवत

rakhi
मुंबई – आयटम गर्ल म्हणून खाय्तीप्राप्त अभिनेत्री राखी सावंत आज रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया मध्ये प्रवेश करणार आहे.

लोकसभा निवडणुकीत राखी सावंतने स्वत:च्या राष्ट्रीय आम पार्टी या पक्षातून मुंबई उत्तरपूर्व मतदार संघातून निवडणूक लढवली होती. या निवडणुकीत राखीला २ हजार ६ मतं मिळाली होती.

मात्र, तिला ही निवडणुक जिंकता आली नाही. या पराभवानंतर काही दिवसांतच राखीने रिपाइं आठवले गटात प्रवेश करण्यासाठी हालचाली सुरू केल्या होत्या. २० जून रोजी राखी सावंतने रिपाइं आठवले गटाचे अध्यक्ष रामदास आठवले यांची भेटही घेतली होती.

Leave a Comment