
पुणे – राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी लवासा प्रकल्पासारखे महाराष्ट्रात आणखी 26 प्रकल्प तयार करता येऊ शकतात, असे म्हटले आहे. पुण्यातील मराठा चेंबर्स ऑफ कॉमर्सच्या 80व्या वर्धापनदिना निमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
शरद पवारांना हवेत ‘लवासा’प्रमाणे आणखी 26 प्रकल्प
माध्यमांनी फक्त लवासासारख्या प्रकल्पाला विरोध करणाऱयांना प्रसिद्धी देऊ नये, असा सल्लाही शरद पवार यांनी दिला आहे. अनेक स्वयंसेवी संस्था आणि पर्यावरण पेमींनी लवासा प्रकल्पाला विरोध केला, मात्र पर्यटकांसाठी लवासा हे आकर्षणाचे केंद्र ठरत आहे. शनिवार व रविवार असे दोन दिवस सुमारे दहा हजार पर्यटक लवासाला भेट देत असतात. लवासाप्रमाणे संपूर्ण महाराष्ट्रात 26 प्रकल्प उभे करता येऊ शकतात. पाण्याची उपलब्धता असलेल्या अशा 26 जागा आहेत. त्यामुळे याकडे सकारात्मक दृष्टीने पाहायला हवे, अशी अपेक्षा पवार यांनी व्यक्त केली.
