नेदरलँड्सने दिला चिलीला झटका

netherland
ब्राझीलिया – फुटबॉल विश्वचषक स्पर्धेतील`बी`ग्रुपमध्ये नेदरलँडला अव्वल स्थान कायम राखण्यात यश आले आहे. त्यांनी चिली विरूध्दच्याी सामन्यात दमदार कामगिरी करताना २-१ च्या फरकाने पराभव करीत बाद फेरीत प्रवेश केला आहे. या विजयाने नेदरलँडच्या आशा पल्ल्वीत झाल्या आहेत.

ऑरेंज आर्मीचा विजयी धडाका कायम असून त्यांनी सलग तिस-या विजयाची नोंद केली आहे. नेदरलँड्सने चिलीवर २-१ ने विजय मिळवत `बी`ग्रुपमधील आपल अव्वल स्थान कायम राखले आहे. दोन विजय मिळवणारी चिली दुस-या स्थानी आहे. पहिल्या दोन्हीही लढतींमध्ये जबरदस्त कामगिरीच प्रदर्शन करणाऱ्या ऑरेंज आर्मीला तिस-या मुकाबल्यात चिलीने कडवी टक्कर दिली. अखेरच्या पाच मिनिटांमध्ये गोल करत नेदरलँड्सने चिलीवर अखेर विजय मिळवला. चिलीने गत उपविजेत्या नेदरलँड्सला केवळ झुंजच दिली नाही तर त्यांना गोल करण्यासाठीही संघर्ष करायला भाग पाडले.

पहिल्या हाफमध्ये एकही गोल झाला नाही. सेकंड हाफमध्ये नेदरलँड्सकडून ७५ व्या मिनिटाला वेस्ले स्नीडरच्या जागी सबस्टीट्यूड म्हणून ग्राऊंडवर उतरवलेल्या लेरॉय फेररने ग्राऊंडवर एन्ट्री घेतल्यानंतर दोन मिनिटांमध्येच गोल करत ऑरेंज आर्मीला पहिल यश मिळवून दिले आहे. डेरिल जॅनमॉच्या कॉर्नर शॉटवर फेरने हेडरद्वारे बॉलला थेट गोलपोस्टचा रस्ता दाखवला. नेदरलँड्ससाठी दुसरा गोल इंज्युरी टाईममध्ये मेम्फिस डिपेने केला. अर्जेन रोब्बेनच्या एका लाजवाब पासवर मेम्पिनने हा गोल केला. रोब्बनेला जरी एकही गोल करता आला नसला तरी त्याच्या जबरदस्त पासमुळे तोही हिरो ठरला. चिलीवर २-० ने विजय मिळवणाऱ्या नेदरलँड्सने नउ पॉईंट्सची कमाई केली आहे. या पराभवामुळे आता ग्रुपमध्ये दुस-यास्थानी असलेल्या चिलीचा नॉक आऊटमध्ये बलाढ्य ब्राझिलशी मुकाबला होणार आहे.

Leave a Comment