
एखाद्या भाषेचा अनुवाद करण्यात अडचण येतेय? विशेषतः परदेशात गेल्यानंतर तेथील भाषा समजून घेण्यात अडचण येतेय? मग क्वेस्ट व्हिज्युअल ने तयार केलेले वर्ड लेन्स ट्रान्सलेटर अॅप तुम्हाला या अडचणीतून सोडवण्यास सज्ज आहे. परदेशात वारंवार जावे लागणार्यांसाठी तर हे अॅप वरदानच ठरणार आहे. विशेष म्हणजे आपल्याला हव्या असलेल्या टेक्सचे भाषांतर करून घेण्यासाठी कोणत्याही प्रकारच्या नेटवर्क कनेक्टिव्हिटीची यासाठी गरज नाही.
भाषांतर करणारे वर्ड लेन्स ट्रान्सलेटर अॅप
आपल्याला ज्या टेक्स्टचे भाषांतर करून हवे असेल त्याचा फोटो आपण आपल्या स्मार्टफोनवर काढायचा की हे अॅप त्याचे भाषांतर करून देईल असे निर्मात्यांचे म्हणणे आहे. जगाच्या कोणत्याही कोपर्यातून हे भाषांतर केले जाऊ शकते आणि फोटो काढताच कांही क्षणात ते तुमच्या स्क्रीनवर दिसते. रशियन, स्पॅनिश, फ्रेंच, इटालियन, जर्मन, पोर्तुगीज भाषांचे इंग्रजीत भाषांतर याच्या द्वारे केले जाते तसेच इंग्रजी टेक्स्टचेही या भाषांत भाषांतर होऊ शकते.
अर्थात या अॅपमध्ये एक उणीव आहे ती म्हणजे हँडरायटिंग अथवा स्टायलिश फाँटमधील लिखाण हे अॅप ओळखू शकत नाही. गुगल प्ले स्टोअर मधून हे अॅप डाऊनलोड करता येणार आहे.
