सुनील नरिनला विंडीज संघाने वगळले

sunil

बार्बाडोस : आयपीएलमध्येे खेळण्यानचा मोह आता परदेशातील क्रिकेटपटूंना देखील आवरत नाही असेच दिसते. त्याचा फटका वेस्ट इंडिजचा फिरकीपटू सुनील नरिनला बसला आहे. आयपीएलच्या फायनलमध्ये खेळण्याच्या कारणावरून त्याला आगामी काळात होत असलेल्या न्युएझिलंड विरूध्दच्या कसोटी मालिकेतून वगळण्यात आले आहे.

गेल्याच काही दिवसांपासून विंडीजचा लेगस्पीसनर सुनील नरिन आयपीएलमधील किंग्ज इलेव्हन पंजाब संघातून खेळत आहे. रविवारी कोलकाता विरुद्ध पंजाब हा आयपीएलचा अंतिम सामना होणार आहे. त्यासामन्यापत सुनील खेळणार आहे. आगामी काळात वेस्ट इंडिजचा संघ न्यूझीलंडच्या दौ-यावर जाणार असून, तिथे तीन कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे.

या मालिकेच्या सराव शिबिरासाठी रविवारी वेस्ट इंडिजमध्ये शिबिर सुरू होत आहे. कोणत्याही खेळाडूने वेस्ट इंडिजच्या सामन्याला प्राधान्य द्यावे, असे वेस्ट इंडिज क्रिकेट बोर्डचे (डब्ल्यूआयसीबी) धोरण आहे. सुनीलने ते न पाळल्याने, त्याला न्यूझीलंड दौ-यातून वगळण्यात आल्याची माहिती डब्ल्यूआयसीबीचे संचालक रिचर्ड पॅबस यांनी दिली.

Leave a Comment