जड सामान बॅगेत भरून ते उचलण्याऐवजी चाके असलेली सूटकेस ओढून नेणे कितीतरी सोयीचे ठरते हे आपण आता स्वानुभवावरून जाणतो. मात्र चाके असलेल्या सुटकेसचा वापर आता माणसे वाहून नेण्यासाठीही होऊ शकणार आहे. चीनमधील हि लियांगसाई या शेतकर्याने दहा वर्षे खपून अशी चाके असलेली सुटकेस तयार केली आहे. त्याचे प्रात्यक्षिक चांगशा रेल्वे स्टेशनसमोर नुकतेच दाखविले गेले.
सूटकेसवर बसून करा प्रवास
सात किलो वजनाच्या या सूटकेसला लियांगसाई याने जीपीएस सिस्टीम आणि अलार्मही बसविलो आहे. गेली दहा वर्षे ही सूटकेस बनविर्यासाठी त्याने प्रयत्न केले आणि अखेरी इलेक्ट्रीक स्कूटर या सुटकेसमध्ये बसविण्यात त्याला यश आले. ही सूटकेस ताशी २० किमी वेगाने एकावेळी ५० ते ६० किमी अंतर जाऊ शकते आणि त्यावरून दोन माणसे प्रवास करू शकतात.
यापूर्वीही माझदा कंपनीने अशी स्कूटर कार तयार केली होती.१९९१ मध्ये तिचे डिझाईन करण्यात आले होते. मध्यप्रदेशातील इंदौर येथील पाच विद्यार्थ्यांनी अशीच इको फ्रेंडली, बॅटरीवर चालणारी सूटकेस कार तयार केली आहे. तर मेक्सिकन डिझायनर व्हिक्टर एलमन याने घडी घालून सुटकेस मध्ये ठेवता येईल अशी सायकल तयार केली आहे.
