बीजी श्रीनिवास पीसीसीडब्ल्यू ग्रुपमध्ये जाणार

shrinivasan
बंगलोर – इन्फोसिसमधून नुकतेच बाहेर पडलेले अध्यक्ष बीजी श्रीनिवास हाँगकाँगमधील पीसीसीडब्ल्यू ग्रुपमध्ये व्यवस्थापकीय संचालक पदावर १५ जुलैपासून रूजू होत असल्याचे पीसीसीडब्ल्यूचे अध्यक्ष रिचर्ड ली यांनी जाहीर केले आहे. श्रीनिवास यांचे माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील खोल ज्ञान, त्यांचा अनुभव, नेतृत्त्व गुण आणि आंतरराष्ट्रीय ओळख कंपनीसाठी मोठ्या फायद्याची ठरणार आहे असेही ली यांनी नमूद केले आहे.

श्रीनिवास गेली १५ वर्षे इन्फोसिसमध्ये कार्यरत होते आणि इन्फोसिसच्या सीईओ पदासाठी त्यांची निवड होणार असल्याचीही चर्चा केली जात होती. मात्र त्यांनी कंपनीचा अचानक राजीनामा दिल्याने आश्चर्य व्यक्त केले जात होते. श्रीनिवास नवीन कंपनीत जॉर्ज चान यांची जागा घेणार असून चान निवृत्त होत असल्याने ही जागा रिकामी झाली होती. पीसीसीडब्ल्यू ही ३.५ अब्ज डॉलर्सचा महसूल असलेली कंपनी आहे आणि टेलिकम्युनिकेशन, मिडिया, आय टी सोल्युशन, प्रॉपर्टी डेव्हलपमेंट, गुंतवणूक क्षेत्रात कार्यरत आहे. श्रीनिवास इन्फोसिस मधून बाहेर पडणारे १० वे उच्चपदस्थ आहेत.

Leave a Comment