फेसबुक आणणार स्लिंगशॉट

facebook
फोटो, व्हिडोओ पाठविण्याची सुविधा देणारी सेवा फेसबुक युजरसाठी आणत असून सध्या या अॅपचे नांव स्लींगशॉट असे केले गेले आहे. स्नॅपचॅट खरेदीत अपयश आल्यानंतर फेसबुकने ही स्वतःची सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला होता. या अॅपच्या सहाय्याने कंपनी युजरसाठी फोटो आणि व्हीडीओ पाठविण्याची सुविधा देत असून ज्या कॉन्टॅक्टला पाठविलेले फोटो अथवा व्हिडीओ डिलिट होण्यापूर्वी फक्त एकदाच पाठविणे शक्य आहे.

२०१२ मध्येही फेसबुकने पोक नावाने स्नॅनचॅटप्रमाणेच सेवा लाँच केली होती. मात्र तिला युजरकडून व त्यातही युवा वर्गाकडून म्हणावा तसा प्रतिसाद मिळाला नव्हता. युवा युजर्स स्नॅनचॅटवरच दररोज ४० कोटी फोटो, व्हिडीओ अपलोड करतात तर हीच संख्या फेसबुकवर ३५ कोटी इतकी आहे. स्नॅपचॅट ३ अब्ज डॉलर्समध्ये खरेदी करण्याचा प्रयत्न फेसबुकने केला होता मात्र ही खरेदी होऊ शकली नाही.

Leave a Comment