
ज्या खेळपट्टीवर पृथ्वी शॉ आपले खातेही उघडू शकला नाही, जिथे श्रेयस अय्यर आणि अजिंक्य रहाणेची बॅट चालली नाही, त्याच 22 यार्डच्या पट्टीवर सूर्यकुमार यादव आणि शिवम दुबे यांनी धुमाकूळ घातला. या दोन्ही फलंदाजांनी सर्व्हिसेसविरुद्ध शानदार फलंदाजी करत 20 षटकांत संघाला 192 धावांपर्यंत मजल मारली. मोठी गोष्ट म्हणजे स्वस्तात 3 विकेट घेतल्यानंतर शिवम दुबे आणि सूर्यकुमार थांबण्याऐवजी आक्रमण करत गेले आणि दोघांनी चौथ्या विकेटसाठी 130 धावांची स्फोटक भागीदारी केली.
11 षटकार, 9 चौकार…शिवम दुबे-सूर्यकुमार यादवने केला कहर, गोलंदाजांना बनवले खेळणे
सूर्यकुमार यादव आणि शिवम दुबे या दोघांनीही आपापल्या शैलीत शॉट्स मारले. दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर अपयशी ठरलेल्या सूर्याने सर्व्हिसेसविरुद्ध चांगली सुरुवात केली. सूर्याने आपले अर्धशतक 31 चेंडूत पूर्ण केले आणि त्याने 4 षटकार आणि 7 चौकार लगावले. तर दुसरीकडे शिवम दुबे वेगळ्याच रंगात दिसला. शिवम दुबेची केवळ दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर टी-20 मालिकेसाठी निवड झाली नव्हती, आता या खेळाडूने सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये आपली ताकद दाखवून दिली. शिवमने या स्पर्धेतील पहिल्याच सामन्यात 36 चेंडूत 71 धावांची नाबाद खेळी केली. दुबेने स्लॉग ओव्हर्समध्ये अप्रतिम फटकेबाजी करत एकूण 7 षटकार ठोकले.
Mumbai have set a target of 193 in front of Services 🎯
Suryakumar Yadav (70 off 46) and Shivam Dube (71*off 37) put on a solid 130-run stand!
Can Services chase it down? #SMAT | @IDFCFIRSTBank
Scorecard ▶️ https://t.co/fYSxpPPSvj pic.twitter.com/0KOJI9uxuy
— BCCI Domestic (@BCCIdomestic) December 3, 2024
सर्व्हिसेसने पहिल्या 9 षटकांत मुंबईच्या धावगतीवर नियंत्रण ठेवले होते आणि तीन विकेट्सही घेतल्या होत्या, पण त्यानंतर सूर्या आणि शिवमच्या भागीदारीने मुंबईला आघाडीवर आणले. मोहित राठी आणि नितीन तन्वर या लेगस्पिनर्सविरुद्ध सूर्या आणि शिवमने खूप धावा केल्या. मोहित राठीने 4 षटकात 45 धावा दिल्या, तर नितीन तन्वरने 4 षटकात 54 धावा दिल्या.
