हॉटेलचे भाडे 3100, खात्यातून कापले गेला 7 लाख, तुम्ही देखील करु नका या महिलेसारखी चूक


एक काळ असा होता की आपण सहलीचे नियोजन करायचो आणि हॉटेल्स बुक करताना खूप अडचणींचा सामना करावा लागायचा. मात्र जेव्हापासून जग डिजिटल झाले आहे. तेव्हापासून लोकांना संघर्ष करावा लागत नाही आणि कामही सोपे झाले आहे. मात्र, सहजतेच्या मागे लागताना अनेक वेळा नुकसान सहन करावे लागते. असेच एक प्रकरण सध्या चीनमधून समोर आले आहे. ज्याने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. ही चूक अतिशय सामान्य असल्याने हा मुद्दा मोठा झाला आहे.

चीनमधून ही धक्कादायक बाब समोर आली आहे, जिथे एका महिलेसोबत असाच काहीसा प्रकार घडला आहे. याबद्दल जाणून तुम्हाला आश्चर्य वाटेल. नेमके झाले असे की त्या महिलेने स्वतःसाठी एक छान हॉटेल बुक केले होते. ज्यासाठी तिला प्रति रात्र 3100 रुपये द्याचे होते, परंतु शेवटी एका चुकीमुळे तिचे बिल 7 लाखांचे झाले. आता जेव्हा तिला तिची चूक कळली, तेव्हा तिच्या पायाखालची जमीनच सरकली.

साऊथ चायना मॉर्निंग पोस्टमधील बातमीनुसार, आरबीआयच्या जिआंगसू प्रांतात राहणाऱ्या शाओ या महिलेने एअरबीएनबीद्वारे स्वत:साठी जेजू आयलंड हॉटेल बुक केले. तिला मित्रासोबत तिथे जायचे होते. हॉटेल्सचा सगळा तपशील वाचून तिने ठरवले की आपल्याला हे हॉटेल हवे आहे. ज्यासाठी तिला 3100 रुपये मोजावे लागले. मात्र, पैसे भरल्यावर तिच्या खात्यातून सात लाख रुपये कापले गेले. कारण जाणून तिला पूर्ण धक्का बसला.

आता तुमच्या मनात हा प्रश्न निर्माण होत असेल की असे काय झाले की महिलेला सात लाख रुपये द्यावे लागले. आता झाले असे की, भाडे चीनी चलन युआनमध्ये दिले जात होते. बुकिंग करताना महिलेने ते कोरियन वॉनचे चिन्ह असे समजले. त्यामुळे तिने ही चूक केली.

जर तुम्ही 3100 चीनी युआन कोरियन वॉनमध्ये रूपांतरित केले, तर ते अंदाजे सात लाख रुपये येते. इतके पैसे कापल्यानंतर महिलेने लगेच हॉटेल कर्मचाऱ्यांशी बोलून आपली चूक सांगितली. त्यानंतर हॉटेल कर्मचाऱ्यांनी चांगली वागणूक दाखवत तिला पैसे परत केले. तथापि, प्रत्येकाचे नशीब इतके चांगले नसते, कारण कधीकधी हॉटेल मालक पैसे परत करण्यास स्पष्टपणे नकार देतात.