जो वारंवार होत होता शून्यावर बाद, तो असा खेळला की सगळे पाहतच राहिले, अफगाणिस्तानने जिंकली एकदिवसीय मालिका


अफगाणिस्तानने बांगलादेशविरुद्धची 3 सामन्यांची वनडे मालिका जिंकली आहे. शारजाह येथे खेळल्या गेलेल्या मालिकेतील शेवटच्या सामन्यात अफगाणिस्तानने बांगलादेशचा 5 विकेट्सने पराभव केला. अफगाणिस्तानच्या बांगलादेशविरुद्धच्या अंतिम आणि निर्णायक विजयात 24 वर्षीय खेळाडू अजमतुल्ला उमरझाईचा मोठा वाटा होता. कदाचित त्याने या सामन्यासाठी आपले सर्वोत्तम वाचवून ठेवले होते म्हणून.

अजमतुल्ला उमरझाई हा तोच खेळाडू आहे, जो या सामन्यापूर्वी मालिकेत सतत शून्यावर बाद होत होता. म्हणजे त्याला खाते उघडणेही अवघड झाले होते. पण, ते म्हणतात ना अंत भला तो सब भला. 24 वर्षीय अफगाण अष्टपैलू खेळाडूने गेल्या सलग दोन सामन्यातील अपयशातून सावरल्यानंतर आपल्या संघासाठी असेच काम केले आहे.

तिसऱ्या आणि निर्णायक एकदिवसीय सामन्यात बांगलादेशने दिलेल्या 245 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना अफगाणिस्तानचे तीन फलंदाज 84 धावांत बाद झाले. त्यानंतर फलंदाजीला आलेल्या अजमतुल्ला उमरझाईने अपेक्षेपेक्षा अप्रतिम खेळी तर केलीच, शिवाय रहमानउल्ला गुरबाजसोबत चौथ्या विकेटसाठी शतकी भागीदारीही केली.
https://x.com/FanCode/status/1856036048473600158?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1856036048473600158%7Ctwgr%5E2d880a5d814ad5bdb3375f19afb3348dd3eb9ca1%7Ctwcon%5Es1_c10&ref_url=https%3A%2F%2Fwww.tv9hindi.com%2Fsports%2Fcricket-news%2Fafg-vs-ban-azmatullah-omarzai-70-runs-and-four-wicket-help-afghanistan-to-beat-bangladesh-in-odi-series-by-2-1-2938425.html
मालिकेतील पहिल्या दोन एकदिवसीय सामन्यांमध्ये आपले खातेही उघडू न शकलेल्या अजमतुल्ला उमरझाईने शेवटच्या सामन्यात 77 चेंडूंचा सामना करत नाबाद 70 धावा केल्या, ज्यात 5 षटकारांचा समावेश होता. त्याने आपल्या 5 व्या षटकारासह संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. ही दमदार खेळी खेळताना उमरझाईने गुरबाजसोबत 100 धावांची भागीदारीही केली. उमरझाईच्या वनडे कारकिर्दीतील हे 7 वे अर्धशतक होते.

बॅटने विजयी खेळी खेळण्यापूर्वी उमरझाईने या सामन्यात चेंडूनेही चांगली कामगिरी केली. बांगलादेशविरुद्ध त्याने 7 षटकांत 37 धावांत 4 बळी घेतले. अशाप्रकारे या सामन्यात आपल्या अष्टपैलू कामगिरीने आणि संघाला एकदिवसीय मालिका जिंकून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या 24 वर्षीय उमरझाईची सामनावीर म्हणून निवड करण्यात आली.

IPL 2025 च्या मेगा लिलावापूर्वी बॅट आणि बॉलसह अजमतुल्ला उमरझाईची ही कामगिरी पाहायला मिळाली. तो आयपीएलमध्ये गुजरात टायटन्सचा भाग होता. जरी फ्रँचायझीने त्याला कायम ठेवले नाही. पण, बांगलादेशविरुद्धची कामगिरी पाहून गुजरात टायटन्स पुन्हा त्याच्यावर सट्टा लावण्यास मागेपुढे पाहणार नाही. एवढेच नाही, तर इतर संघही त्याच्यावर लक्ष ठेवू शकतात. म्हणजेच अफगाणिस्तानच्या या युवा क्रिकेटरवर करोडो रुपयांचा पाऊस पडताना दिसला तर आश्चर्य वाटायला नको.