हे 4 नंबर करा WhatsApp वर सेव्ह, तुमच्या सर्व समस्यांचे होईल निवारण


जर तुम्ही व्हॉट्सॲप वापरत असाल, तर खाली दिलेले नंबर तुमच्यासाठी फायदेशीर ठरतील. हे नंबर सेव्ह केल्यानंतर तुम्हाला कळेल की तुम्हाला कशाचीही गरज लागणार नाही आणि तुमचे काम घरी बसून होईल. जर तुम्ही कोणताही सरकारी पेपर पास करण्याची तयारी करत असाल, तर शंका दूर करणे, गॅस सिलिंडर घरपोच ऑर्डर करण्यापासून ते अन्न वितरणापर्यंत सर्व काही व्हॉट्सॲपद्वारे केले जाऊ शकते. व्हॉट्सॲपवर या सर्व सेवांचा लाभ घेण्यासाठी येथे नमूद केलेले क्रमांक तुमच्या संपर्कांमध्ये सेव्ह करा.

हे नंबर मदत करतील
यासाठी, Doubtnut (Dout Solving): +91-8400400400 हा क्रमांक तुमच्या संपर्कांमध्ये सेव्ह करा. या क्रमांकावर तुम्ही तुमच्या कोणत्याही प्रश्नांची आणि शंकांची उत्तरे मिळवू शकता. हा नंबर उत्तरासह त्याच्याशी संबंधित व्हि़डीओ देखील दाखवेल, जे पाहून तुम्ही तुमच्या शंकेचे योग्य रित्या निरासन करु शकाल.

घरबसल्या करा सिलेंडर बुक
याशिवाय तुम्हाला घरबसल्या सिलेंडरची ऑर्डर करायची असेल, तर हा नंबर तुमच्यासाठी आहे. इंडियन ऑइल +91-7588888824 हा नंबर तुमच्या फोनमध्ये सेव्ह करा. यावर तुम्ही केवळ सिलेंडरच बुक करू शकत नाही, तर तुमच्या आवडीनुसार डिलिव्हरीचा दिवस आणि वेळ देखील निवडू शकता. एवढेच नाही तर त्याचे पेमेंट तुम्ही ऑनलाइनही करू शकता.

ट्रेनमध्ये ऑर्डर करा जेवण
तुम्ही ट्रेनने खूप प्रवास करत असाल, तर झूप (ट्रेनमध्ये खाद्यपदार्थ वितरण) +91-7042062070 या व्हॉट्सॲप नंबरवर हाय मेसेज पाठवा. येथून तुम्ही ट्रेनमध्ये बसून जेवण ऑर्डर करू शकता. याशिवाय तुम्ही तुमचा पीएनआर स्टेटस तपासू शकता. तुम्हाला ट्रेनमध्ये कोणतीही अडचण येत असेल किंवा तुम्हाला कोणी त्रास देत असेल, तर तुम्ही इथूनच तक्रार करू शकता.

फ्लाइट संबंधित अपडेट
जर तुम्ही फ्लाइटने प्रवास करत असाल, तर तुम्ही फ्लाइट बुकिंग करू शकता आणि 7065145858 या नंबरद्वारे फ्लाइटची स्थिती देखील तपासू शकता. हा नंबर तुमच्या फ्लाइटशी संबंधित जवळपास सर्व समस्या सोडवू शकतो. तुम्हाला फक्त या नंबरवर ‘हाय’ पाठवायचा आहे, त्यानंतर जे काही प्रश्न विचारले जातात त्याची उत्तरे देत रहा. तुमचा प्रश्न लिहून तुम्ही उत्तर मिळवू शकता.