Car Servicing: गाडी कमी धावली की जास्त, किती किलोमीटरनंतर करावी गाडीची सर्व्हिसिंग?


तुमची कार नेहमी चांगल्या स्थितीत राहावी आणि तुम्हाला वाटेत कधीही कमी पडू नये, असे तुम्हालाही वाटत असेल, तर त्यासाठी तुम्ही वेळोवेळी कारची सर्व्हिसिंग करत राहावी. कार सर्व्हिसिंगबाबत लोकांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण होतात, जसे की गाडी कमी धावली, तर किती वेळानंतर सर्व्हिसिंग करायची?

याशिवाय जर गाडी खूप धावत असेल, तर किती वेळानंतर गाडीची सर्व्हिसिंग करणे योग्य आहे? आज आम्ही तुम्हाला या सर्व प्रश्नांची उत्तरे देणार आहोत जेणेकरुन पुढच्या वेळी तुम्ही तुमच्या कारची सर्व्हिसिंग करून घेताना तुम्हाला या प्रश्नांची उत्तरे शोधण्याची गरज नाही.

जर तुम्ही नवीन कार घेतली असेल, तर तुम्हाला कारसोबत एक लॉग बुक मिळाले असेल, किती किलोमीटरनंतर सर्व्हिसिंग करावी याची माहिती लॉग बुकमध्ये दिली जाते. जर तुम्ही नवीन कार घेतली असेल, तर पहिली सर्व्हिसिंग 1000 किलोमीटरवर केली जाते.

तुमची कार जुनी असेल आणि तुमच्याकडे लॉग बुक नसेल, तर तुम्ही काय करावे? तर आम्ही तुम्हाला सांगतो, जर तुमची कार कमी चालत असेल, तर तुम्ही 1 वर्षाच्या आत कारची सर्व्हिसिंग करून घ्यावी. त्याच वेळी, जर तुमची कार जास्त धावत असेल, तर दर 10,000 किलोमीटरवर कारची सर्व्हिसिंग करून घेण्याची सवय लावा.

सर्व्हिसिंग योग्य वेळी न केल्यास, तुमचा ड्रायव्हिंगचा अनुभव बिघडू शकतो, इंधनाचा वापर वाढू शकतो आणि कारमध्ये तांत्रिक समस्या येण्याची शक्यताही वाढू शकते. इंजिन ऑइल वेळेवर बदलल्यास इंजिन नेहमी सुरळीत चालू राहते, अन्यथा इंजिन खराब होऊ लागते.

फक्त इंजिन ऑइलच नाही, तर ब्रेक ऑइल देखील तपासले पाहिजे, जर तुम्ही अचानक ब्रेक लावला आणि ब्रेकिंग सिस्टम बिघडली, तर रस्ता अपघात होऊ शकतो.