
अंडर-19 क्रिकेटमध्ये अनेकदा असे खेळाडू असतात, जे लहान वयातच आपल्या कौशल्याने आपल्याला आश्चर्यचकित करतात. आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्स संघात खेळणाऱ्या 18 वर्षीय क्वेनो माफाकाने आपल्या वेगवान गोलंदाजीने खळबळ उडवून दिली. त्यानंतर लगेचच त्याची आयपीएलसाठी निवड झाली. आता असेच एक नाव श्रीलंका महिला क्रिकेट अंडर-19 संघातून समोर आले आहे, जिने आपल्या फिरकी गोलंदाजीने सर्वांना चकित केले आहे. सोशल मीडियावर तिच्या गोलंदाजीचे खूप कौतुक होत आहे.
Video : 14 वर्षाच्या मुलीने उद्धवस्त केला अर्धा संघ, मोडला मोठा विक्रम
श्रीलंका क्रिकेटने एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये चामोडी प्रबोदा नावाची केवळ 14 वर्षांची खेळाडू तिच्याच चेंडूवर शानदार झेल घेताना दिसत आहे. वास्तविक, श्रीलंका, ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यात महिला अंडर-19 संघाची एकदिवसीय तिरंगी मालिका खेळली जात आहे. या मालिकेतील तिसऱ्या सामन्यात श्रीलंकेची स्लो लेफ्ट आर्म बॉलर चामोडी हिने आपल्या फिरकी गोलंदाजीने इंग्लंडच्या फलंदाजांना उद्ध्वस्त केले. या सामन्यात चामोडीने 9 षटके 3 चेंडूत केवळ 42 धावा देत 5 विकेट घेतल्या. अवघ्या 14 वर्षे 350 दिवसांत तिने ही कामगिरी केली आहे. यासह, चामोडी ही गेल्या 11 वर्षातील पहिली क्रिकेटपटू ठरली आहे, जिने वयाच्या 15 वर्षापूर्वी एका डावात 5 विकेट्स घेतल्या होत्या. याआधी बांगलादेशच्या मोहम्मद निहादुझमानने वेस्ट इंडिजविरुद्ध ही कामगिरी केली होती.
Young gun Chamodi on FIRE!
A brilliant 'Caught and Bowled' to dismiss England's Charis Pavely, and she goes on to take a FIVE-FOR! #SLvENG #SriLankaU19 #U19TriSeries #YoungTalent #CricketGamata pic.twitter.com/l7PpRcWHLv— Sri Lanka Cricket 🇱🇰 (@OfficialSLC) April 9, 2024
श्रीलंकेने इंग्लंडला 227 धावांचे लक्ष्य दिले होते. या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी उतरलेला इंग्लंडचा संघ केवळ 118 धावांत गडगडला. चामोडीने या तिरंगी मालिकेतील दोन सामन्यांमध्ये 8 विकेट घेतल्या आहेत. याआधी या देशांदरम्यान टी-20 तिरंगी मालिकाही झाली होती, ज्यामध्ये तिने 4 सामन्यात 2 विकेट घेतल्या होत्या.
मात्र, हा व्हिडिओ पाहिल्यानंतर श्रीलंकन क्रिकेटने नक्कीच आनंद व्यक्त केला आहे. पण गेल्या काही काळापासून श्रीलंकेचा कोणताही संघ मोठ्या स्पर्धांमध्ये कामगिरी करण्यात अपयशी ठरला आहे. हे खेळाडू आंतरराष्ट्रीय क्रिकेटसाठी योग्य प्रकारे तयार करण्यात बोर्ड अपयशी ठरले आहे. श्रीलंका क्रिकेट बोर्डाकडे लोक सातत्याने अशा तक्रारी करत आहेत.
