
न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात वेलिंग्टन येथे सुरू असलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात वाद झाला. हा वाद ऑस्ट्रेलियाचा फलंदाज उस्मान ख्वाजाच्या बॅटवरून झाला. सामन्याच्या तिसऱ्या दिवशी शनिवारी ख्वाजा फलंदाजी करत असताना त्याला त्याच्या बॅटवरील कबुतर पक्ष्याचे स्टिकर काढावे लागले. ऑस्ट्रेलियाच्या दुसऱ्या डावात ख्वाजाची बॅट तुटली होती. यानंतर त्याने आपली बॅट बदलली. ख्वाजाकडे आलेल्या बॅटवर पक्ष्याचे स्टिकर होते, जे ख्वाजाने काढले आणि नंतर बॅटिंगला सुरुवात केली.
उस्मान ख्वाजाने बॅट काय बदलली, निर्माण झाला वाद, सगळीकडे होत आहेत चर्चा, जाणून घ्या काय आहे कारण
वास्तविक, आयसीसीने ख्वाजाला तसे करण्यास मनाई केली होती. पाकिस्तानविरुद्ध खेळल्या गेलेल्या मालिकेत ख्वाजाने आयसीसीकडे कबुतर पक्ष्याचे स्टिकर आपल्या बॅटवर लावता येईल का, याची परवानगी मागितली होती. पण आयसीसीने त्याला हे करू दिले नाही. आयसीसीने याला राजकीय निषेध म्हटले आहे. ख्वाजाने गाझामधील युद्धामुळे पीडित लोकांप्रती शोक व्यक्त करण्यासाठी परवानगी मागितली होती. त्यामुळे आयसीसीने याला राजकीय मानले आणि परवानगी दिली नाही.
Usman Khawaja was forced to remove a dove sticker from his bat on day three of the Wellington Test.
😶🤐#NZvAUS pic.twitter.com/qiveyDmNOd
— Ops Sports (@SportsFunFan) March 2, 2024
आयसीसीने नकार दिल्यानंतर ख्वाज नेट सेशनमध्ये अशा प्रकारची बॅट वापरत होता. क्रिकेट ऑस्ट्रेलियाचे सीईओ निक हॉकली आणि कसोटी कर्णधार पॅट कमिन्स यांनी ख्वाजाला पूर्ण पाठिंबा दिला आणि त्याला त्याचे मत मांडण्याचा पूर्ण अधिकार असल्याचे सांगितले. पाकिस्तानविरुद्धच्या पहिल्या सामन्यात ख्वाजाने हातावर काळी पट्टी बांधली होती आणि त्यामुळे त्याला टीकेलाही सामोरे जावे लागले होते. गाझामध्ये होत असलेले हत्याकांड हेही त्यामागचे कारण असल्याचे सांगण्यात आले. ख्वाजा याचा जन्म इस्लामाबाद, पाकिस्तान येथे झाला. त्यामुळे हा वाद आणखी पेटला. ख्वाजाला पर्थमध्येच पाकिस्तानविरुद्धच्या मालिकेत काळे शूज घालण्यापासून रोखण्यात आले होते. या बुटांवर दोन संदेश लिहिलेले होते, त्यापैकी एक संदेश होता, सर्व जीवन समान आहे आणि स्वातंत्र्य हा मानवी हक्क आहे.
दरम्यान, ख्वाजा मोठी खेळी करू शकला नाही आणि लवकर बाद झाला. तो केवळ 28 धावा करून बाद झाला. ऑस्ट्रेलियन संघाला दुसऱ्या डावातही आश्चर्यकारक काही करता आले नाही. संघ अवघ्या 164 धावांत गडगडला. संघाकडून नॅथन लियॉनने सर्वाधिक 41 धावा केल्या. कॅमेरून ग्रीनने 34 धावांचे योगदान दिले. ट्रॅव्हिस हेड 29 धावा करण्यात यशस्वी ठरला.
