प्रभासच्या ‘बाहुबली’पेक्षा मोठ्या बजेटमध्ये बनवलेल्या या अभिनेत्याचा चित्रपट करु शकला नाही कमाई


चित्रपट बनवताना कथा आणि स्टारकास्टसोबतच निर्माते चित्रपटाच्या बजेटचाही खूप विचार करतात. चित्रपटाचे बजेट निश्चित झाल्यानंतर स्टारकास्टची फी लॉक केली जाते आणि कुठे आणि किती पैसे खर्च करायचे, याचे नियोजन केले जाते. आजच्या काळात 200 कोटींचे चित्रपट बनवण्याचा ट्रेंड सर्रास सुरू आहे. पण जेवढे मोठे बजेट, तेवढे निर्मात्यांचे टेन्शन वाढत जाते. त्यामुळेच अनेकदा मोठ्या बजेटच्या चित्रपटांमध्येही मोठी स्टारकास्ट असल्याचे पाहायला मिळते.

साऊथ स्टार प्रभासचा ‘बाहुबली: द बिगिनिंग’ हा चित्रपट ब्लॉकबस्टर ठरला. हा चित्रपट बनवण्यासाठी निर्मात्यांनी पाण्यासारखा पैसा खर्च केला होता. प्रभासच्या ‘बाहुबली: द बिगिनिंग’चे बजेट 180 कोटी रुपये होते आणि या चित्रपटाने भारतात 418 कोटी रुपयांचा मोठा व्यवसाय करून सर्वांना चकित केले. पण तुम्हाला माहिती आहे का की, ‘बाहुबली: द बिगिनिंग’ पेक्षा जास्त बजेट असलेला चित्रपट 2023 साली थिएटरमध्ये प्रदर्शित झाला होता.

हा चित्रपट दुसरा कोणी नसून टायगर श्रॉफचा ‘गणपत’ आहे, जो गेल्या वर्षी 20 ऑक्टोबरला प्रदर्शित झाला होता. एका रिपोर्टनुसार, हा चित्रपट मोठ्या बजेटमध्ये बनवण्यात आला होता. टायगरच्या 10 वर्षांच्या फिल्मी करिअरमधील हा सर्वात मोठा बजेट पिक्चर होता. हा चित्रपट बनवण्यासाठी 200 कोटी रुपये खर्च करण्यात आले. पण टायगरचा हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरला. मिळालेल्या माहितीनुसार, या चित्रपटाने केवळ 13 कोटींचा व्यवसाय केला.

तसे पाहायला गेले, तर हा चित्रपट मोठा फ्लॉप ठरला. मात्र, सध्या टायगर श्रॉफकडे दोन मोठे चित्रपट आहेत. तो लवकरच अक्षय कुमारसोबत बडे मियाँ छोटे मियाँ या चित्रपटात दिसणार आहे. हा एक ॲक्शन चित्रपट असणार आहे. याशिवाय टायगर श्रॉफ रोहित शेट्टीच्या सिंघम अगेन या चित्रपटातही खास कॅमिओ म्हणून झळकणार आहे. हा चित्रपट हमखास हिट मानला जात आहे. सिंघम अगेनमध्ये अनेक मोठे स्टार्स कॅमिओ करणार आहेत.