योद्धा चित्रपटात सारा अली खानचा आहे सरप्राईज रोल? हा सीन पाहून लोकांमध्ये उडाली एकच खळबळ


बॉलिवूड अभिनेता सिद्धार्थ मल्होत्राकडे सध्या अनेक प्रोजेक्ट्स आहेत. अभिनेत्याच्या आगामी ‘योद्धा’ या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. चाहत्यांनाही ट्रेलर खूप आवडला आहे. या चित्रपटात सिद्धार्थ मल्होत्राची जबरदस्त ॲक्शन पुन्हा एकदा पाहायला मिळत आहे. ‘शेरशाह’ या चित्रपटापासून लोक सिद्धार्थ मल्होत्राला सैनिकाच्या भूमिकेत पसंत करत आहेत. जरी हा चित्रपट चित्रपटगृहात प्रदर्शित होऊ शकला नसला, तरी हा चित्रपट सिद्धार्थच्या करिअरचा टर्निंग पॉइंट मानला जात आहे. आता अभिनेता योद्धा चित्रपटातही अशाच भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत दिशा पटानी आणि राशि खन्ना देखील आहेत. पण या चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये लोक आणखी एका अभिनेत्रीची दखल घेत आहेत. ही अभिनेत्री दुसरी कोणी नसून सारा अली खान आहे.

नुकताच योद्धा चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला. या ट्रेलरमध्ये सिद्धार्थ मल्होत्रा ​​पुन्हा एकदा आपल्या ॲक्शनने लोकांना प्रभावित करताना दिसत आहे आणि चाहत्यांची उत्सुकताही वाढवत आहे. चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये 1 मिनिट 10 सेकंदाचा एक सीन आहे, ज्यामध्ये एक एअर होस्टेस कॉलवर बोलत आहे. जिचा चेहरा पूर्णपणे दिसत नाही आणि फक्त बाजूचा चेहरा दिसतो. पण हा चेहरा दुसरा तिसऱ्या कोणाचा नसून सारा अली खानचा आहे, असे अनेकांचे मत आहे.

वृत्तांवर विश्वास ठेवला तर असा अंदाज वर्तवला जात आहे की या चित्रपटात सारा अली खानचीही भूमिका आहे, पण निर्मात्यांनी तिची भूमिका सरप्राईज ठेवली आहे. या भूमिकेत अभिनेत्री एअर होस्टेसच्या गेटअपमध्ये दिसत आहे. ती चित्रपटात आहे की नाही हे चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतरच कळेल. सध्या तिची भूमिका पूर्णपणे रहस्यमय ठेवण्यात आली आहे. चित्रपटाच्या रिलीजबद्दल बोलायचे झाले, तर हा चित्रपट 15 मार्च 2024 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.