
बॉलिवूड अभिनेता शाहिद कपूर आणि क्रिती सेनन त्यांच्या आगामी ‘तेरी बातों में ऐसा उल्झा जिया’ या चित्रपटामुळे गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहेत. आता या चित्रपटाच्या प्रदर्शनासाठी अवघे 2 दिवस उरले आहेत. ‘तेरी बातों में ऐसा उल्झा जिया’चा ट्रेलर रिलीज होताच प्रेक्षकांना तो खूप आवडला होता. हा एक कॉमेडी चित्रपट असणार आहे. प्रेक्षक या चित्रपटाच्या प्रदर्शनाची खूप वाट पाहत आहेत.
TBMAUJ Advance Booking : शाहिद-क्रितीच्या चित्रपटाने प्रदर्शित होण्यापूर्वीच केली धुंआधार कमाई, छापल्या इतक्या नोटा
दरम्यान, शाहिद आणि क्रितीच्या चित्रपटाने प्रदर्शनापूर्वीच कमाईचा सिलसिला सुरू केला आहे. ‘तेरी बातों में ऐसा उल्झा जिया’चे ॲडव्हान्स बुकिंग सुरू झाले असून चित्रपटाची तिकिटे सातत्याने बुक केली जात आहेत. मिळालेल्या माहितीनुसार या चित्रपटाला पहिल्याच दिवशी चांगला प्रतिसाद मिळू शकतो. शाहिद आणि क्रितीची केमिस्ट्री पाहण्यासाठी चाहते खूप उत्सुक आहेत. दरम्यान, पहिल्याच दिवशी आगाऊ बुकिंगची आकडेवारी समोर आली आहे.
SACNILC च्या ताज्या अहवालानुसार, ‘तेरी बातों में ऐसा उल्झा जिया’ चित्रपटाची आतापर्यंत 22 हजारांहून अधिक तिकिटे विकली गेली आहेत. शाहिदच्या चित्रपटाच्या आकडेवारीबद्दल सांगायचे तर, ‘तेरी बातों में ऐसा उल्झा जिया’ने रिलीजपूर्वीच 45.55 लाख रुपयांचा व्यवसाय केला आहे. मात्र, चित्रपटाच्या प्रदर्शनासाठी अजून काही कालावधी बाकी आहे. त्यामुळे शाहिद आणि क्रितीच्या चित्रपटाची ओपनिंग धमाकेदार ठरू शकते, असे मानले जात आहे.
‘तेरी बातों में ऐसा उल्झा जिया’ या कथेबद्दल सांगायचे तर, ही कथा एका संगणक अभियंता आर्यनची आहे. ज्याची भूमिका शाहिद कपूर या चित्रपटात साकारताना दिसणार आहे. चित्रपटात शाहिदचे हृदय एका रोबोटवर येते. ज्याचे नाव सिफ्रा. ही व्यक्तिरेखा क्रिती सेनॉनने साकारली आहे. सिफ्रा हा बॅटरीवर चालणारा रोबोट आहे. आता मानव आणि यंत्रमानवांची कथा किती यशस्वी ठरते. हे चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतरच कळेल.
