अॅनिमलमधील कलाकाराने वाचवले आत्महत्या करणाऱ्या मुलीचे प्राण, व्हिडिओ झाला व्हायरल


रणबीर कपूरच्या ‘अॅनिमल’ या चित्रपटाच्या चर्चा सध्यातरी थांबायते नाव घेत नाही आहे. या चित्रपटातील प्रत्येक पात्राला प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळाले आहे. चित्रपटातील रणबीरच्या भावांनीही सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. संदीप रेड्डी वंगा यांच्या अॅनिमल या चित्रपटात दिसलेला अभिनेता मनजोत सिंग सध्या चर्चेत आहे. अॅनिमलमधून त्याला खूप प्रसिद्धी मिळाली. पण तो खऱ्या आयुष्यातील हिरोच्या रुपात सर्वांसमोर आला आहे. अभिनेत्याने एका मुलीचे प्राण वाचवले आहेत.

मनजोत सिंगचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. जो कोणी हा व्हिडिओ पाहत आहे, तो अभिनेत्याचे कौतुक करताना थकत नाही. वास्तविक, या व्हिडिओमध्ये एक मुलगी आत्महत्येचा प्रयत्न करताना दिसत आहे. तिच्या आजूबाजूला अनेक लोक आहेत. पण मनजोतने हिंमत दाखवली आणि सावधपणे त्या मुलीकडे सरकतो आणि उडी मारण्याआधीच तिला वाचवतो.


हा व्हिडिओ समोर आल्यानंतर लोक त्याला केवळ फिल्मी हिरोच नाही, तर रिअल लाइफ हिरोही म्हणत आहेत. मात्र, हा व्हिडिओ 2019 सालचा आहे आणि याचा खुलासाही अभिनेत्यानेच केला आहे. मनजोतने त्याच्या इन्स्टा अकाउंटवर हा व्हिडिओ पोस्ट केला आहे. यासोबतच त्या काळातील परिस्थितीही कॅप्शनद्वारे लिहिली आहे. अभिनेता लिहितो की, 2019 मध्ये असे घडले की एका मुलीने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आणि देवाच्या कृपेने मी तिला वाचवू शकलो, मी योग्य वेळी त्या ठिकाणी होतो. आपल्या सर्वांना समस्या आणि अडचणींचा सामना करावा लागतो “कधीकधी जगणे हे धैर्याचे काम असते.”

रणबीर कपूरच्या अॅनिमलमध्ये मनजोत सिंगला त्याच्या भावाची भूमिका साकारायला मिळाली होती. या अभिनेत्याने त्याच्या साईड रोलमध्येही आपल्या कामाने सर्वांची मने जिंकली होती. सध्या त्याचे खूप कौतुक होत आहे. त्याचा व्हायरल व्हिडिओ खूप लाइक केला जात आहे.