पहिल्या चित्रपटासाठी मिळाले 25 हजार रुपये, आज ऑस्कर विजेते एआर रहमान यांचे किती आहे मानधन?


एआर रहमान हे संगीत क्षेत्रातील एक मोठे नाव आहे. लोक त्यांचा आवाज ऐकण्यासाठी उत्सुक असतात. ते एक असे गायक आहेत, ज्यांना ऑस्कर पुरस्कारही मिळाला आहे. पण, तुम्हाला माहिती आहे का एआर रहमान यांच्या आयुष्यात एक काळ असा आला होता, जेव्हा ते पै पै साठी मोहताज होते. हे ऐकून तुम्हाला धक्का बसेल, पण हे खरे आहे. आज करोडोंची कमाई करणारे संगीत कलाकार एकेकाळी गरिबीचे बळी होते. जाणून घेऊया त्यांनी जमिनीपासून आस्मानापर्यंतचा प्रवास कसा पूर्ण केला? तसेच, आज त्यांच्याकडे किती संपत्ती आहे?

एआर रहमान यांचे नाव भारतातील सर्वाधिक मानधन घेणाऱ्या संगीतकारांमध्ये समाविष्ट आहे. आपल्या संगीताच्या जोरावर त्यांनी देशातच नव्हे, तर जगभरात एक जबरदस्त ओळख निर्माण केली आहे. 6 जानेवारी 1967 रोजी चेन्नईमध्ये जन्मलेले एआर रहमान आज 58 वर्षांचे झाले. एकेकाळी आर्थिक संकटाचा सामना करणाऱ्या या संगीतकाराला आज लक्झरी लाइफची खूप आवड आहे.

तुम्हाला सांगतो की, गाण्याआधी ते जाहिरातींसाठी जिंगल्स बनवायचे. 1992 मध्ये प्रसिद्ध चित्रपट निर्माते मणिरत्नम यांनी ‘रोजा’ चित्रपटातील संगीतासाठी त्यांच्याशी संपर्क साधला. त्यानंतर त्यांचे नशीब पालटले. त्यांच्या संगीताने, त्यांनी रोजासाठी एक असे गाणे तयार केले, जे सुपर-डुपर हिट ठरले. रिपोर्टनुसार, एआर रहमान यांना ‘रोजा’ चित्रपटाला संगीत देण्यासाठी 25,000 रुपये मानधन मिळाले होते.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, आता एआर रहमान एका चित्रपटाला संगीत देण्यासाठी 8 कोटी रुपये मानधन घेतात. त्यांच्या पहिल्या चित्रपटासाठी त्यांना नगण्य रक्कम मिळाली असली, तरी आज ते 2000 कोटींहून अधिक किमतीच्या मालमत्तेचे मालक आहेत. एवढेच नाही, तर रहमान यांचे चेन्नईतील घर हे त्यांच्या आलिशान मालमत्तांपैकी एक आहे. ऑस्कर विजेते एआर रहमान यांच्याकडेही लॉस एंजेलिसमध्ये एक आलिशान अपार्टमेंट आहे.

‘स्लमडॉग मिलेनियर’ मधील ‘जय हो’ गाण्यासाठी एआर रहमान यांना सर्वोत्कृष्ट ओरिजनल स्कोअर आणि सर्वोत्कृष्ट मूळ गाण्याचा पुरस्कार मिळाल होता. रहमान यांची एकूण संपत्ती 2330 कोटी रुपये आहे. तसेच, त्यांचे मासिक उत्पन्न किमान 4 कोटी रुपये आहे. एवढेच नाही तर 1 ते 2 तासांच्या परफॉर्मन्ससाठी 1 ते 2 कोटी रुपये घेतात. ते विविध चॅरिटी शोमध्येही परफॉर्म करतात.