Heart Care : हिवाळ्यात घ्या तुमच्या हृदयाची काळजी, या सोप्या टिप्स येतील कामी


हिवाळ्याच्या आगमनाबरोबर रोगराईनेही कहर सुरू केला आहे. काही व्यक्ती सर्दी, खोकला आणि तापाने त्रस्त राहतात. खाणे-पिणे असो किंवा नियमित तपासणी असो, कोणत्याही प्रकारे निष्काळजी राहणे योग्य नाही. आरोग्य तज्ज्ञ सांगतात की, थंडीच्या काळात स्वत:ला अॅक्टिव्ह ठेवणे खूप गरजेचे आहे. यामुळे रक्ताभिसरण सुधारेल आणि हृदयाचे आरोग्यही चांगले राहील.

त्याच बरोबर आपल्या घरातील वडिलधाऱ्यांबद्दल बोलायचे झाले, तर त्यांना जास्त शारीरिक श्रम करणे शक्य नसते. आपली जीवनशैली आणि आहार यांचा हृदयाच्या आरोग्यावर खूप परिणाम होतो. तर हे लक्षात घेऊन आम्ही तुम्हाला काही सोप्या हेल्थ टिप्स सांगणार आहोत, ज्यामुळे हिवाळ्यात तुमचे हृदय निरोगी राहिल.

उच्च रक्तदाब ही प्रत्येक घरातील समस्या बनली आहे. बऱ्याच प्रकरणांमध्ये हे इतके सहज सापडत नाही. याला सायलेंट किलर असेही म्हणतात. बीपी वाढल्यामुळे हृदयाच्या समस्येचा धोका लक्षणीय वाढतो. त्यामुळे आपण आपला रक्तदाब नियमितपणे तपासला पाहिजे.

कदाचित तुम्हाला माहित नसेल की व्हिटॅमिन डीच्या कमतरतेमुळे हृदयाच्या कार्यावरही परिणाम होतो. व्हिटॅमिन डी हाडे आणि स्नायूंसाठी खूप महत्वाचे आहे, शरीरात त्याच्या कमतरतेमुळे, हृदयाशी संबंधित आजार वाढण्याचा धोका असतो. सूर्यप्रकाश हा व्हिटॅमिन डीचा समृद्ध स्रोत आहे. हिवाळ्यात वेळोवेळी व्हिटॅमिन डीच्या चाचण्या करत राहायला हव्यात.

हिवाळ्यात बहुतेक लोक पाणी पिण्याचे कमी करतात. पण या ऋतूत शरीरानुसार स्वतःला हायड्रेट ठेवा. पाणी पिण्याचे कमी करू नका, फक्त ताजे अन्न खा आणि फ्रीजमध्ये ठेवलेली कोणतीही वस्तू थोडा वेळ बाहेर ठेवा आणि मगच खा. तुम्हाला थंडी वाजत असेल, तर रूम टेम्परेचरचे पाणी थंड वाटत असले तर कोमट पाणी प्या.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही