Bajaj Chetak : ‘वडीलांच्या काळातील’ ही स्कूटर झाली 15 हजारांनी स्वस्त, पूर्ण चार्ज झाल्यावर धावेल 108 किमी


चेतक स्कूटर वडिलांच्या काळात खूप लोकप्रिय होती आणि आता या स्कूटरचा इलेक्ट्रिक अवतार देखील उपलब्ध आहे. जर तुम्हाला या सणासुदीच्या हंगामात नवीन इलेक्ट्रिक स्कूटर घ्यायची असेल, तर बजाज ऑटो बजाज चेतकवर 15,000 रुपयांची बंपर सूट देत आहे.

एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे की ही उत्सवी किंमत केवळ स्टॉक टिकेपर्यंत वैध आहे. कंपनीकडून सणासुदीच्या सवलतीनंतर आता चेतक इलेक्ट्रिक स्कूटर खरेदी करणे आणखी स्वस्त झाले आहे.

बजाज चेतकची किंमत 1 लाख 30 हजार रुपये (एक्स-शोरूम) असली तरी, आता 15 हजार रुपयांच्या सवलतीनंतर तुम्ही ही इलेक्ट्रिक स्कूटर केवळ 1 लाख 15 हजार रुपयांमध्ये (एक्स-शोरूम) घरी आणू शकता.

बजाज चेतकमध्ये 2.9 kWh बॅटरी आहे, जी पूर्ण चार्ज केल्यावर 108 किलोमीटरपर्यंत ड्रायव्हिंग रेंज देते. या स्कूटरचा टॉप स्पीड 63 kmph आहे, या स्कूटरची बॅटरी 5 तासात 0 ते 100 टक्के चार्ज होते. ही स्कूटर इको आणि स्पोर्ट या दोन राइडिंग मोडसह येते.

मजबूत सॉलिड मेटल बॉडीसह येणारी, ही स्कूटर ब्लूटूथ कनेक्टिव्हिटीसह येते. कंपनीची देशभरात 100 हून अधिक सेवा केंद्रे आहेत. कंपनीच्या अधिकृत साइटवर दिलेल्या माहितीवरून असे दिसून येते की स्कूटरसोबत काही चांगले फायनान्स पर्याय आहेत, जसे की 60 महिन्यांपर्यंतचे कर्ज घेतले जाऊ शकते.

डिस्काउंटनंतर ही स्कूटर आता Ather 450S आणि Ola S1 Air आणि TVS iQube सारख्या इलेक्ट्रिक स्कूटरपेक्षा स्वस्त झाली आहे. सध्या केवळ कर्नाटक आणि तामिळनाडूमध्ये राहणाऱ्या ग्राहकांनाच या विशेष ऑफरचा लाभ मिळत आहे. ही सणाची ऑफर इतर राज्यांमध्ये सुरू केली जाईल की नाही हे कंपनीने अद्याप पुष्टी केलेली नाही.