
सुपरस्टार सलमान खान नेहमीच त्याच्या चाहत्यांना आश्चर्यचकित करत असतो. सलमान त्याच्या आगामी ‘टायगर 3’ या चित्रपटामुळे बऱ्याच दिवसांपासून चर्चेत आहे. या चित्रपटाची चाहत्यांना प्रचंड उत्सुकता आहे. काल सलमान खानने एक पोस्ट शेअर केली होती आणि त्याला एक मैसेज देना है. देता हूं कल..टाइगर का मैसेज कल 11 बजे. आपल्या वचनानुसार सलमान खानने एक नवीन पोस्ट शेअर करून आपला संदेश सर्वांना दिला आहे.
Tiger Zinda Hai 3 : देशद्रोही की देशभक्त, टायगर भारताकडून मागत आहे कॅरेक्टर सर्टिफिकेट
सलमान खानने एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये टायगर आपल्या देशातील लोकांना संदेश देताना दिसत आहे. व्हिडिओमध्ये टायगर लोकांना प्रश्न करत आहे की, 20 वर्षे देशासाठी जीव धोक्यात घालून आज त्याला देशद्रोही म्हटले जात आहे. टायगर पुढे म्हणतो की, तो देशद्रोही होता की देशभक्त हे आता देशातील लोक सांगतील. टायगर 3 च्या या व्हिडिओने चाहत्यांची उत्कंठा वाढवली आहे. टायगरचा हा संदेश खूप ताकदवान आहे. सलमान खानच्या लूकपासून त्याच्या डायलॉग्सपर्यंत सगळेच अप्रतिम आहे. चित्रपटात अॅक्शन करताना सलमानकडून नजर हटवणे चाहत्यांसाठी अवघड आहे.
अशी काही दृश्ये आहेत ज्यात सलमान खानला पाहून चाहत्यांना तोंडात बोटे घालण्यास भाग पाडले जाईल. सलमान खानच्या टायगरबद्दल चाहते मोठे दावे करत आहेत. टायगर जवान आणि पठाणला मागे टाकू शकतो, असा विश्वास चाहत्यांना आहे. टायगर 3 बॉक्स ऑफिसवर नवा इतिहास रचू शकतो. या चित्रपटाकडून निर्माते आणि स्टारकास्टच्या खूप अपेक्षा आहेत. मात्र, टायगर 3 मध्ये काय आश्चर्य आहे, हे चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतरच कळेल. या चित्रपटात सलमान खान आणि कतरिना कैफ व्यतिरिक्त इम्राम हाश्मी देखील एका दमदार भूमिकेत दिसणार आहे.
सलमान खानच्या टायगर 3 मध्ये पठाणचा धमाकेदार कॅमिओ देखील जोडला जाणार आहे. या चित्रपटात सलमान आणि शाहरुख खान पुन्हा एकदा बॉक्स ऑफिसवर एकत्र दिसणार आहेत. शाहरुख आणि सलमान एकत्र येणे म्हणजे हिटची हमी. यापूर्वी पठाणमध्ये सलमानचा जबरदस्त कॅमिओ दाखवण्यात आला होता. ज्यात त्याला पठाणचा जीव असे म्हटले जात होते.
