Health Tips : तुप लावून चपाती खाल्ल्याने वाढते का वजन? जाणून घ्या दाव्याची सत्यता


देशी तूप भारतीय घरांमध्ये शतकानुशतके वापरले जात आहे. देशी तुपातील औषधी गुणधर्मामुळे घरगुती उपचारांमध्येही त्याचा वापर केला जातो. पण बहुतेक लोकांना देशी तूप चपातीला लावून खायला आवडते. तूप केवळ चपातीची चवच वाढवत नाही, तर ते आरोग्यासाठीही खूप फायदेशीर आहे.

ज्या लोकांना वजन कमी करायचे आहे, ते अनेकदा तुपापासून दूर राहतात. चपातीला तूप लावण्यापूर्वी ते अनेक वेळा विचार करतात. काही लोकांचा असा विश्वास आहे की जर त्यांनी चपातीला तूप लावून खाल्ल्यास वजन वाढते. तुपामध्ये अनेक प्रकारचे फॅट्स असतात, ज्यामुळे लोक आपल्या आहारात त्याचा समावेश करण्यास घाबरतात. तुप लावून चपाती खाल्ल्याने वजन वाढते का?

न्यूट्रिशियनिस्ट सांगतात की चपातीला तूप लावून खाण्याचा वजन वाढण्याशी काही संबंध नाही. हे एक मिथक आहे. ते म्हणतात की जर चपातीवर तूप लावून खाल्ल्यास वजन कमी करणे सोपे होईल, कारण त्याचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी होईल. यामुळे रक्तातील साखर वाढण्यापासूनही बचाव होईल. ग्लायसेमिक इंडेक्स आपल्या रक्तातील ग्लुकोजवर अन्न किती लवकर परिणाम करतो हे सांगते.

तूप खाल्ल्याने फक्त चांगले कोलेस्ट्रॉल सुधारत नाही, तर हार्मोन्सचे संतुलनही सुधारते, असेही आरोग्य तज्ज्ञ सांगतात. ज्यांना पचनाशी संबंधित कोणतीही समस्या आहे, त्यांच्यासाठी देशी तूप खूप फायदेशीर ठरू शकते. आपण जे काही अन्न खात आहोत, त्यात तूप घातल्याने त्याचे शोषण दुप्पट होते.

कदाचित तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की करीना कपूर आणि मलायका अरोरा यांच्यासह अनेक बी-टाउन सेलिब्रिटी त्यांच्या दिवसाची सुरुवात तुपाने करतात. हे त्यांना वजन कमी करण्यास मदत करते.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही