जवानने रचला इतिहास, मोडला पठाणचा विक्रम, गदर 2 चा गेम ओव्हर


अॅटली दिग्दर्शित शाहरुख खान आणि नयनतारा यांच्या जवान या चित्रपटाने पहिल्याच दिवशी सिद्ध करून दाखवले आहे की त्याच्यासमोर क्वचितच कोणी उभे राहू शकेल. शाहरुख खानच्या या चित्रपटाने रिलीज झाल्यानंतर इतिहास रचला आहे. जवान हा किंग खान आणि निर्मात्यांच्या अपेक्षांवर खरा उतरला आहे. पठाणही जवानसमोर गुडघे टेकताना दिसत आहे. जन्माष्टमीच्या मुहूर्तावर रिलीज झालेल्या ‘जवान’ला जनतेचे उदंड प्रेम लाभले आहे.

शाहरुख खानच्या चाहत्यांच्या नजरा चित्रपटाच्या पहिल्या दिवसाच्या कमाईवर लागून आहेत. पहिल्या दिवसाचे आकडे शाहरुखच्या चाहत्यांना नाचायला भाग पाडतील. सरेस्टारने चाहत्यांच्या अपेक्षा पूर्ण केल्या आहेत. जवानने बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई केली आहे. ज्यासमोर पठाण आणि गदर 2 दोघेही गुडघे टेकवताना दिसत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, जवानने पहिल्याच दिवशी भारतात 75 कोटींचा मोठा व्यवसाय केला आहे. त्यात सर्व भाषांचे कलेक्शन समाविष्ट आहे.

दुसरीकडे, फक्त हिंदी भाषेबद्दल बोलायचे झाले, तर शाहरुख खानच्या जवानने 63-65 कोटी रुपये कमवले आहेत. तमिळ भाषेबद्दल बोलायचे झाले तर, चित्रपटाने येथे 5 कोटींचा व्यवसाय केला आहे आणि तेलुगू भाषेतही जवान 5 कोटी कमवण्यात यशस्वी झाला आहे. म्हणजेच शाहरुखचा चार्म दक्षिणेतही पाहायला मिळत आहे.

जवानचे पहिल्या दिवसाचे आकडे समोर आल्यानंतर या चित्रपटाने शाहरुखच्या पठाणला पहिल्या दिवसाच्या कमाईच्या बाबतीत खूपच मागे टाकल्याचे स्पष्ट झाले आहे. पठाणने पहिल्याच दिवशी 55 कोटींचा व्यवसाय करून नवा विक्रम केला होता. मात्र आता जवानने तो विक्रम मोडीत काढला आहे. जवान आता हिंदी चित्रपटसृष्टीत सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला आहे.